Battery swap service: लवकरच ‘या’ कारणांमुळे ई-रिक्षांसाठी बॅटरी स्वॅप सेवा सुरू होणार

होंडा या वर्षाच्या शेवटापर्यंत भारतात इलेक्ट्रिक रिक्षांसाठी बॅटरी स्वॅप सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. कंपनी 2050 पर्यंत तिच्या सर्व प्रोडक्टसाठी आणि कॉर्पोरेट बदल तसेच कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे.

Battery swap service: लवकरच ‘या’ कारणांमुळे ई-रिक्षांसाठी बॅटरी स्वॅप सेवा सुरू होणार
बॅटरी शेअरिंग
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 14, 2022 | 11:20 AM

जपानी ऑटो क्षेत्रातील प्रमुख कंपनी होंडा (Honda) या वर्षाच्या अखेरीस भारतात इलेक्ट्रिक रिक्षांसाठी बॅटरी स्वॅप सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. कंपनी तिच्या सर्व प्रोडक्टसाठी आणि कॉर्पोरेट झिरो कार्बन उत्सर्जन करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून कंपनी 2023 पर्यंत फ्लेक्स फ्यूअल असलेल्या बाइक्स भारतात आणणार आहे. फ्लेक्स फ्यूअल असलेली वाहने संपूर्णपणे पेट्रोल (Petrol) किंवा बायो-इथेनॉल किंवा दोन्हीचे मिश्रण असलेल्या इंधनावर चालण्यास सक्षम असतात. होंडाने याबाबत मंगळवारी एक प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यानुसार, पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicles) वार्षिक विक्री 10 दशलक्ष युनिट्सपर्यंत आणि 2030 पर्यंत 3.5 दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढवण्याचे त्यांचे ध्येय आहे.

काय आहे धोरण?

कंपनीने सांगितले, की सध्या ग्लोबल इलेक्ट्रिक टु-व्हीलर मार्केटचा आकार दरवर्षी सुमारे 50 दशलक्ष युनिट्स इतका आहे. यापैकी बहुतांश इलेक्ट्रिक मोपेड आणि इलेक्ट्रिक सायकली चीनमध्ये बनवलेल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतात इलेक्ट्रिक ट्रायसायकल टॅक्सींसाठी बॅटरी शेअरिंग सेवा सुरू करण्याची होंडा योजना आखत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय होंडा शेअरिंग करण्यायोग्य बॅटरीच्या मानकीकरणावरही काम करत आहे.

होंडा इलेक्ट्रिक हायब्रीड कार

जगातील सर्व कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्याच्या तयारीत आहेत. हे पाहता होंडा लवकरच इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने होंडा सिटीची इलेक्ट्रिक हायब्रीड आवृत्ती म्हणजेच eHEV लॉन्च केली आहे. ही एक मजबूत हायब्रिड कार असेल. कंपनीचा दावा आहे की ही कार 26 kmpl चा मायलेज देईल.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें