Petrol : तुमच्या गाडीतलं पेट्रोल शुद्ध आहे का? कसा ओळखायचा दर्जा? काही सेकंदात तपासू शकता; जाणून घ्या…

एका लिटरमागे पेट्रोलचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशावेळी अशुद्ध पेट्रोल गाडीत टाकल्यास इंजिनही खराब होते, शिवाय आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.

Petrol : तुमच्या गाडीतलं पेट्रोल शुद्ध आहे का? कसा ओळखायचा दर्जा? काही सेकंदात तपासू शकता; जाणून घ्या...
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Aug 02, 2022 | 8:42 PM

भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक इंधन (Fuel) आखाती आणि इतर देशांमधून आयात करतो. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने 100 रुपयांचा आकडाही ओलांडला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमागे केंद्र सरकारकडून (Central government)  आयात शुल्क आणि उत्पादन शुल्क, राज्य सरकारांकडून व्हॅट, मालवाहतूक, डीलरचे मार्जिन इत्यादी प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे जास्त किंमत मोजण्यासोबतच पेट्रोलचा दर्जा तपासणेही तितकेच गरजेचे आहे. कमी दर्जाच्या पेट्रोलमुळे इंजिन खराब होऊ शकते. येथे आम्ही नमूद केलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून पेट्रोलची गुणवत्ता तपासू शकता. कार चालवण्यासाठी पेट्रोलची गरज असते, पण वाहनाच्या चांगल्या आयुष्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. चांगल्या दर्जाचे पेट्रोल (Petrol)  वापरल्याने वाहनाचे आयुष्यही सुधारते. वाहनाची कार्यक्षमता आणि मायलेज हे मुख्यत्वे पेट्रोलच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

फिल्टर पेपर वापरा

खराब पेट्रोलचा वाहनाच्या कार्बोरेटरवर खूप वाईट परिणाम होतो आणि वाहनाचे इंजिन खराब होते. सामान्यतः पेट्रोलची गुणवत्ता तपासण्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते. परंतु ही उपकरणे घरी व्यवस्थित करणे फार कठीण आहे. त्यामुळे पेट्रोलची गुणवत्ता तपासण्यासाठी तुम्ही फिल्टर पेपर वापरू शकता. फिल्टर पेपर बाजारात सहज उपलब्ध आहे. पेट्रोलची गुणवत्ता तपासण्यासाठी ही पद्धत सर्वात सोपी मानली जाते. पेट्रोल तपासणे गरजेचे आहे. एका लिटरमागे पेट्रोलचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशावेळी अशुद्ध पेट्रोल गाडीत टाकल्यास इंजिनही खराब होते, शिवाय आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.

हे सुद्धा वाचा

अशा प्रकारे पेट्रोलचा दर्जा तपासा

पेट्रोलचा दर्जा तपासण्यापूर्वी वाहनाचे नोझल स्वच्छ करा. नोझलवर कोणतीही घाण राहू नये. नोझलमधून पेट्रोलचा एक थेंब फिल्टर पेपरवर टाका. काही क्षणातच पेट्रोल सुकते. पेट्रोल फुंकल्यानंतर फिल्टर पेपरवर कोणताही डाग दिसत नसेल तर याचा अर्थ पेट्रोलची गुणवत्ता चांगली आहे. जर फिल्टर पेपरवर कोणतीही घाण किंवा डाग दिसत असेल तर याचा अर्थ पेट्रोलची गुणवत्ता खराब आहे. असे झाल्यास तुम्ही संबंधित पेट्रोल पंपाविरुद्ध ग्राहक संरक्षण विभागाकडे तक्रार करू शकता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें