Swift, WagonR, ते Vitara Brezza, मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर जबरदस्त डिस्काऊंट

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) एप्रिल 2021 मध्ये विशेष ग्राहक सवलत (Special consumer discount) जाहीर केली आहे.

Swift, WagonR, ते Vitara Brezza, मारुती सुझुकीच्या 'या' गाड्यांवर जबरदस्त डिस्काऊंट
Maruti Suzuki

मुंबई : मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) एप्रिल 2021 मध्ये विशेष ग्राहक सवलत (Special consumer discount) जाहीर केली आहे. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे. एक्सचेंज ऑफर केवळ 7 वर्ष जुन्या वाहनांवर लागू असेल. (Huge discounts on Maruti Suzuki Swift, WagonR, SPresso, Vitara Brezza and Alto)

मारुती कंपनी Arena आणि नेक्सा आउटलेटच्या मदतीने त्यांच्या मॉडेल्सची विक्री करते. आपल्याला अरेनामध्ये नियमित मॉडेल्स मिळतात, त्या आपल्याला प्रीमियम मॉडेल्ससाठी नेक्सा आउटलेटमध्ये जावे लागते. मारुती सुझुकीने अरेना डीलरशिप अंतर्गत विकल्या जाणाऱ्या वाहनांवर सूट जाहीर केली आहे. यात तुम्हाला 26,000 ते 41,000 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी अल्टो कार आहे, जी कंपनीच्या लाइनअपमधील सर्वात परवडणारी कार आहे. या कारवर तुम्ही 30,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

अल्टोवर ग्राहकांना 12,0000 रुपयांचा Consumer Discount, 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत मिळत आहे. त्याचवेळी, मारुती सुझुकी S presso वर 14,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. या गाडीवर तुम्ही एकूण 32000 रुपयांची बचत करु शकता.

WagonR 26 हजारांची सूट

WagonR – MT/CNG/AMT वर तुम्ही एकूण 26,000 रुपये वाचवू शकता. यात 8000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस मिळत आहे. त्याचबरोबर सेलेरियोच्या व्हेरिएंट्सवर 33,000 रुपयांची बचत करता येईल. यामध्ये तुम्हाला 15,000 रुपयांची सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत मिळत आहे. एक्सचेंज बोनस केवळ 7 वर्ष जुन्या गाड्यांवर लागू आहे.

स्विफ्टच्या पेट्रोल व्हेरिएंटवर बचत

मारुती स्विफ्टच्या पेट्रोल व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही यावर 33,000 रुपयांची बचत करु शकता. तर डिझायर कॉम्पॅक्टवर 31,000 रुपयांची बचत होईल. यामध्ये ग्राहक सवलत 8000 रुपये, एक्सचेंज बेनिफिट 20,000 रुपये आणि 3000 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंटचा लाभ मिळेल.

इको व्हॅनवर 28000 रुपयांची सूट

मारुती सुझुकी इकोबद्दल बोलायचे झाल्यास, या व्हॅनवर तुम्हाला 28,000 रुपयांची सूट मिळू शकते. सध्या कंपनीने अर्टिगावर कोणतीही सूट जाहीर केलेली नाही, परंतु ब्रेझा पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 10,000 आणि 20,000 रुपयांची सूट दिली आहे.

इतर बातम्या

Tigor पासून Harrier पर्यंत, Tata ‘या’ गाड्यांवर 65000 रुपयांची सूट

Renault India चा जलवा, गाड्यांच्या विक्रीत तब्बल 278 टक्क्यांची वाढ

ही जबरदस्त कार 8 लाख रुपये सवलतीत उपलब्ध, कार विकत घेण्याची चांगली संधी

(Huge discounts on Maruti Suzuki Swift, WagonR, SPresso, Vitara Brezza and Alto)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI