AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खास भारतीयांसाठी डिझाईन केलेली Hyundai ची दमदार 7 सीटर SUV लाँचिंगसाठी सज्ज

ह्युंदायने (Hyundai) गेल्या महिन्यात आपल्या आगामी सेव्हन सीटर एसयूव्ही अलकाझारची (SUV Alcazar) घोषणा केली होती.

खास भारतीयांसाठी डिझाईन केलेली Hyundai ची दमदार 7 सीटर SUV लाँचिंगसाठी सज्ज
Hyundai Alcazar
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 18, 2021 | 7:39 AM
Share

मुंबई : ह्युंदायने (Hyundai) गेल्या महिन्यात आपल्या आगामी सेव्हन सीटर एसयूव्ही अलकाझारची (SUV Alcazar) घोषणा केली होती. ही कार केवळ भारतात लॉन्च केली जाणार आहे. अलकाझार (Alcazar) ही मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर (मिड साइज SUV) आधारित असेल जी क्रेटापेक्षा थोडी मोठी कार असेल. या कारच्या तिसर्‍या रांगेतील आसनंदेखील थोडी मोठी असतील. दरम्यान आता, असे म्हटले जात आहे की, ही कार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केली जाऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून या वाहनाचे लीक झालेले फोटोज समोर येत आहेत. (Hyundai Alcazar to launch in India in April 2021)

ह्युंदाय मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) काही दिवसांपूर्वी या कारविषयी म्हटले होते की, कंपनी यावर्षी अलकाझार (Hyundai Alcazar) मॉडेलच्या जागतिक पदार्पणासह भारतातल्या सात सीटर प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ग्राहक बिझनेस ट्रॅव्हल करत असेल अथवा कौटुंबिक सहलीवर असेल, तेव्हा ह्युंदाय अलकाझार ग्राहकांना गतिशीलता प्रदान करेल.

HMIL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एसएस किम म्हणाले होते की, “2021 हे वर्ष एचएमआयएलच्या इतिहासामध्ये एक नवीन अध्याय जोडेल, कारण आम्ही नवीन सेगमेंटमध्ये प्रवेश करून त्यास नव्याने डिफाईन करण्यास तयार आहोत. देशात ह्युंदायला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल बोलताना किम म्हणाले की, “आम्ही ह्युंदाय Alcazar च्या जागतिक लाँचिंगसह भारतीय ग्राहकांप्रती आमच्या वचनबद्धतेवर जोर देऊ. Hyundai Alcazar सात सीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करेल, या सेगमेंटमध्ये महिंद्रा एक्सयूव्ही 500, नुकत्याच लाँच झालेली 2021 टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस या एसयूव्हींना ह्युंदायची Alcazar टक्कर देईल.

HMIL ने म्हटले आहे की Alcazar लक्झरी डिझाईनकडून प्रेरित आहे, जे आकर्षक आणि प्रशस्त तसेच मजबुतीचं प्रतीक आहे. ही कार अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि टेक्नोसॅव्ही ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आली आहे. तथापि, कंपनीने त्यांच्या या आगामी उत्पादनाशी संबंधित अधिक माहिती दिलेली नाही.

शानदार डिझाईन

दरम्यान, आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंमधून या कारच्या डिझाइन आणि स्टायलिंगबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हे वाहन थोडे वेगळे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ही कार इतर वाहनांपेक्षा भिन्न दिसावी. Alcazar चं एक्सटिरियर ग्राहकांना आकर्षित करेल. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललॅम्प्स, एक मोठा फ्रंट ग्रिल, 17 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, बाजूला कॅरेक्टर लाईन्स आणि प्लॅस्टिक क्लॅडींग मिळतील.

फीचर्स

कारमधील सीट्सच्या मधल्या रांगेत, कंपनी कप होल्डरसह आर्मरेस्ट प्रदान करू शकते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग व स्टोरेज स्पेसही देण्यात येईल. एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. ही 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. नवीन मॉडेलमध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील मिळतील.

दमदार इंजिन

या कारसोबत दोन इंजिन पर्यायांची ऑफर केली जाऊ शकते, म्हणजेच 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन यात दिलं जाऊ शकतं. क्रेटाला 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113bhp आणि 145Nm टॉर्क उत्पन्न करतं.

भारतात 3200 कोटींची गुंतवणूक

ह्युंदाय कंपनी भारतातला त्यांचा उत्पादन पोर्टफोलिओ आणि कार लाँचिंगचं प्रमाण वाढवण्यासाठी 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी आता ग्रीन मोबिलिटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. जेणेकरून लोकल ऑपरेशन्स मजबूत होऊ शकतील. कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कंपनी त्यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ह्युंदाय आगामी काळात अनेक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यादीमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहनांचादेखील समावेश आहे. दक्षिण कोरियन कार निर्मात्या कंपनीने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात (पँसेंजर व्हीकल मार्केट) कंपनीचा एकूण 17 टक्के वाटा आहे.

इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एसएस किम म्हणाले की, भविष्यात चांगल्या वृद्धीसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. भविष्यात प्रॉडक्ट लाइनअपमध्ये अशा अनेक मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार असतील ज्या अतिशय कमी किंमतीत बनवल्या जातील. यासाठी कंपनी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

इतर बातम्या

2 रुपयात 5 किमी धावणार, ‘ही’ इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या

Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

Renault Kiger खरेदी करताय? इतके महिने वाट पाहावी लागेल

(Hyundai Alcazar to launch in India in April 2021)

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...