अवघ्या 25000 रुपयात Hyundai Alcazar बुकिंगसाठी उपलब्ध, 7-सीटर SUV मध्ये काय आहे खास?

भारतात आणखी एक मिड-साइज एसयूव्हीची एंट्री होणार आहे. Hyundai Motors कंपनी त्यांची बहुप्रतीक्षित Alcazar ही कार लाँच करणार आहे.

अवघ्या 25000 रुपयात Hyundai Alcazar बुकिंगसाठी उपलब्ध, 7-सीटर SUV मध्ये काय आहे खास?
Hyundai Alcazar
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 11:59 PM

मुंबई : ह्युंदाय इंडियाने (Hyundai India) आपली आगामी SUV Alcazar काही महिन्यांपूर्वी सादर केली होती. कंपनीने या कारचे अधिकृत फोटो लीक केले आहेत. कोरियन कंपनी ही कार Tucson, क्रेटा आणि वेन्यू या कार्सच्या पोर्टफोलिओमध्ये लाँच करणार आहे. विशेष बाब म्हणजे Alcazar SUV ह्युंदाय इंडियाची पहिली थ्री रो सेगमेंटमधली कार असेल. दरम्यान, नुकतीच कंपनीने या कारची लाँचिग डेट जाहीर केली आहे. ही कार 18 जून रोजी भारतात लाँच केली जाईल. (hyundai started Bookings for Alcazar SUV at 25000, launching on 18th june)

दरम्यान, लाँचिंगपूर्वीच कंपनीने या कारसाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. अवघे 25 हजार रुपये भरुन ग्राहक ही शानदार एसयूव्ही बुक करु शकतात. कोरोना साथीच्या रोगामुळे यंदा बऱ्याच गाड्यांचं लाँचिंग रद्द करण्यात आलं. या यादीमध्ये ह्युंदायच्या Alcazar एयसूव्हीचाही समावेश आहे. ही कार आतापर्यंत लाँच होणं अपेक्षित होतं, परंतु कंपनीने या कारचं लाँचिंग पुढे ढकललं होतं. आता ही एसयूव्ही 18 जून 2021 रोजी लाँच केली जाईल.

Alcazar लॉन्चिंगसाठी सज्ज

Alcazar भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मागील काही वर्षांपासून कंपनी क्रेटाच्या यशावर अवलंबून आहे. परंतु Alcazar च्या लाँचिंगनंतर ह्युंदाय भारतीय मार्केटमध्ये अधिक दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रेटा प्रमाणे Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळतील ज्यात 3rd जनरेशन Nu 2 लीटर पेट्रोल आणि U2 1.5 लीटर डिझेल इंजिनाचा समावेश असेल. पेट्रोल इंजिन 159 PS पॉवर आणि 191 Nm टॉर्क देईल तर डिझेल युनिट 115 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देईल.

शानदार डिझाईन

दरम्यान, आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंमधून या कारच्या डिझाइन आणि स्टायलिंगबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हे वाहन थोडे वेगळे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ही कार इतर वाहनांपेक्षा भिन्न दिसावी. Alcazar चं एक्सटिरियर ग्राहकांना आकर्षित करेल. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललॅम्प्स, एक मोठा फ्रंट ग्रिल, 17 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, बाजूला कॅरेक्टर लाईन्स आणि प्लॅस्टिक क्लॅडींग मिळतील.

फीचर्स

कारमधील सीट्सच्या मधल्या रांगेत, कंपनी कप होल्डरसह आर्मरेस्ट प्रदान करू शकते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग व स्टोरेज स्पेसही देण्यात येईल. एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. ही 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. नवीन मॉडेलमध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील मिळतील.

दमदार इंजिन

या कारसोबत दोन इंजिन पर्यायांची ऑफर केली जाऊ शकते, म्हणजेच 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन यात दिलं जाऊ शकतं. क्रेटाला 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113bhp आणि 145Nm टॉर्क उत्पन्न करतं.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

(hyundai started Bookings for Alcazar SUV at 25000, launching on 18th june)

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.