AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच्या वेळी चालवत असाल गाडी तर झोप टाळण्यासाठी अवश्य करा या गोष्टी

रात्रीच्या वेळी अनेकांना गाडी चालवावी लागते आणि अनेक वेळा थकव्यामुळे यावेळी झोप लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही बळावते. तुम्हीही रात्री गाडी चालवत असाल तर..

रात्रीच्या वेळी चालवत असाल गाडी तर झोप टाळण्यासाठी अवश्य करा या गोष्टी
रात्रीच्या वेळी कार चालवतांना अशी घ्या काळजीImage Credit source: Social Media
| Updated on: May 14, 2023 | 2:39 PM
Share

मुंबई : रस्त्यावर वाहन चालवणे हे अतिशय जबाबदारीचे काम आहे (Tips For Night Driving) आणि त्यात थोडीशी चूक तुमच्या जीवाला तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. त्यामुळे वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे रात्रीच्या वेळी अनेकांना गाडी चालवावी लागते आणि अनेक वेळा थकव्यामुळे यावेळी झोप लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही बळावते. तुम्हीही रात्री गाडी चालवत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून झोपेमुळे तुमचा अपघात होणे टाळता येऊ शकेल.

गाडी रस्त्याच्या कडेला लावा

वाहन चालवताना जेव्हा केव्हा तुम्हाला झोप येते आहे असे जाणवले तेव्हा तुम्ही वाहन थोडावेळ रस्त्याच्या कडेला पार्क करावे, वाहनातून बाहेर पडून फेरफटका मारावा किंवा थोडे पातपाय हलवावे. त्यासोबत थोडे पाणी प्या आणि डोळ्यांवर पाणी शिंपडा. यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होईल आणि सुस्ती दूर होण्यास मदत मिळेल.

अतिरीक्त भोजन टाळा

जेंव्हा पोटभर अन्न खाल्ले जाते तेंव्हा झोप यायला वेळ लागत नाही. म्हणूनच गाडी चालवण्यापूर्वी अति अन्न खाऊ नका. थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खाणे चांगले राहील , ज्यामुळे तुमला सुस्ती येणार नाही तसेच तुम्हाला एनर्जी मिळत राहील.

आवडती गाणी ऐका

तुम्ही तुमची आवडती गाणी ऐकू शकता जेणेकरून गाडी चालवताना तुम्हाला झोप येणार नाही. शक्य झाल्यास गाणे गुणगूना झोपेला दूर सारण्यासाठी हा उपाय खुप प्रभावी आहे. यामुळे तुमचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत मिळेल.

पहा-कॉफी प्या

गाडी चालवताना झोप येत असेल तर वाटेत ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये थांबून हलका नाश्ता किंवा चहा-कॉफी प्यावी. हे तुम्हाला जास्त काळ जागे राहण्यास मदत करेल. मात्र याचे अति सेवन करणे टाळावे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.