AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Isuzu वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

इसुझू मोटर्स इंडिया (Isuzu Motors India) कंपनीने जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत

Isuzu वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय
Isuzu Motors
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 05, 2021 | 11:18 PM
Share

मुंबई : इसुझू मोटर्स इंडिया (Isuzu Motors India) कंपनीने जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी 1 मार्च 2021 ते 31 मे 2021 दरम्यान संपणार आहे. ती मुदत आता 31 जूलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. Isuzu ने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. (Isuzu Motors India extends free service and warranty of their vehicles due to Corona lockdown)

कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

Tata Motors चं ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट

टाटा मोटर्सने (Tata Motors) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

टाटा मोटर्सच्या कस्टमर केअर हेड डिंपल मेहता यांनी जाहीर केले की, कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं आहे. अशा परिस्थितीत सध्या कोणताही ग्राहक त्यांच्या कारच्या सर्व्हिस आणि दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती ज्या ग्राहकांची सर्व्हिस आणि वॉरंटी अद्याप प्रलंबित आहे अशा ग्राहकांसमोर आव्हान उभे आहे.

Maruti ने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

मारुती सुझुकीने बुधवारी जाहीर केले की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 15 मार्च ते 31 मे दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले आहेत की, आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी ही घोषणा केली आहे. आम्ही वाहनांची विनामूल्य सर्व्हिस, वॉरंटी आणि एक्सटेंडेड वॉरंटी 30 जून पर्यंत वाढविली आहे. दरम्यान, मारुतीसह इतर अनेक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय

(Isuzu Motors India extends free service and warranty of their vehicles due to Corona lockdown)

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप