AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इटलीची इलेक्ट्रीक स्कूटर भारतात होणार लॉंच, बॅटरीत आहे भन्नाट सुविधा, महाराष्ट्राच्या या शहरात कंपनीचा प्लांट

या नवीन इटालीयन कंपनीच्या बाईक थ्री डिफरन्ट मोडवर चालविण्याची सुविधा आहे. त्यात इको, कॉन्फर्ट आणि स्पोर्ट्स अशा तीन मोडची सुविधा आहे. फ्रंट आणि रेअर लँप एलईडी आहेत. या बाईकच्या बॅटरी खास वैशिष्ट्ये पूर्ण आहेत.

इटलीची इलेक्ट्रीक स्कूटर भारतात होणार लॉंच, बॅटरीत आहे भन्नाट सुविधा, महाराष्ट्राच्या या शहरात कंपनीचा प्लांट
ITALY VLF LAUNCH ELECTRIC TWO WHEELERImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 07, 2024 | 4:19 PM
Share

इटलीचा ‘टू व्हीलर ब्रँड’ Velocifero ( VLF )ने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. या स्कूटरचा मॅन्युफॅक्टरींग प्लांट कोल्हापूरात वसविण्यात येत आहे. येत्या सणासुदीच्या मोसमात या इलेक्ट्रीक स्कूटरच्या दोन आवृत्त्या बाजारात दाखल होत आहे.व्हीएलएफने भारतीय बाजारात KAW Veloce Motors Pvt.Ltd. या कंपनीशी पार्टनरशिप केली आहे. KAW Veloce Motors ही कंपनी भारतात या कंपनीच्या स्कूटरची निर्मिती आणि वितरण करणार आहे. या परदेशी ब्रॅंडचे भारतातील पहिली स्कूटर यंदाच्या दिवाळीच्या आधीच लॉंच होण्याची शक्यता आहे. टेनिस इलेक्ट्रीक स्कूटरच्या फॉर्ममध्ये ही इलेक्ट्रीक स्कूटर दाखल होणार आहे.

Italy च्या VLF कंपनीची भारतात आपले जाळे पसरविण्याची योजना आहे. टीयर-1 आणि टियर – 2 शहरात कंपनीला आपले उत्पादन विकायचे आहे. कंपनीला 15 डीलर शिप सुरु करणार असून मार्च 2025 च्या अखेरपर्यंत 50 डीलरशिप उभारण्यात येणार आहे. ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर प्रदर्शनात सहभाग घेणार आहे.

टेनिस ई-स्कूटरची वैशिष्ट्ये

व्हीएलएफ कंपनी दोन्ही मॉडेलमध्ये चेंज करता येणार्‍या प्रत्येकी दोन 84 व्होल्टच्या लिथियम बॅटरी पुरविणार आहे. पहिल्या मॉडेल 1500 W मोटरची दर ताशी 45 किमीचा कमाल वेग धारण करणारे आहे. एका सिंगल चार्जिंगमध्ये या मॉडलची बाईक 60 किमी धावणार आहे. त्यामुळे शहरातल्या शहरात चालविण्यासाठी ही चांगली बाईक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दुसरे मॉडेल 4000W क्षमतेच्या बॅटरीचे असून एका सिंगल चार्जिंगमध्ये ते जर तर ताशी 40 किमी वेगाने चालविल्यास 100 किमी पर्यंत ती धावू शकेल असा कंपनीचा दावा आहे. बॅटरी संपू्र्ण चार्ज करण्यासाठी पाच ते सहा तासांचा अवधी लागणार आहे.

किंमत गुलदस्त्यात

हाय टेन्सील स्टील फ्रेमच्या Tennis 1500W चे वजन बॅटरीसह केवळ 88 किलोग्रॅम इतके आहे. तर 4000W मॉडेलचे वजन 10 किलोग्रॅमने जास्त आहे. दोन्ही दिशेच्या चाकांना डिस्क ब्रेक आहे. स्पीडो मीटरसाठी 5.5 इंचाचा डिजीटल TFT डिस्प्ले आहे. रायडरला थ्री डिफरन्ट मोडवर ही स्कूटर चालविण्याची सुविधा आहे. त्यात इको, कॉन्फर्ट आणि स्पोर्ट्स अशा तीन मोडची सुविधा आहे. बाईकचे फ्रंट आणि रेअर लँप एलईडी  आहेत. या मॉडेलची किंमत काय असणार आहे हे कंपनीने कळविलेले नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.