Car Sales : Maruti आणि Tata सह ‘या’ कंपन्यांच्या वाहनविक्रीत वाढ

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टाटासह (Tata) अनेक कंपन्यांनी जानेवारीमध्ये झालेल्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत.

Car Sales : Maruti आणि Tata सह 'या' कंपन्यांच्या वाहनविक्रीत वाढ
मारुती सुझुकीच्या छोट्या मोटारींची मार्चमध्ये धूम
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 7:00 PM

नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टाटासह (Tata) अनेक कंपन्यांनी जानेवारीमध्ये झालेल्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज (1 फब्रुवारी) सादर केला. दरम्यान, मारुतीने (Maruti) त्यांच्या देशांतर्गत विक्रीत 4.3 टक्के वाढ झाल्याची माहिती जाहीर केली आहे. (January car sales of these companies including Maruti, Tata and hyundai increased; know details)

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2020 मध्ये 1 लाख 54 हजार 123 वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुतीने यंदा जानेवारी महिन्यात 1 लाघ 60 हजार 752 वाहनांची विक्री केली आहे. मारुतीच्या प्रवासी व्हेईकल्सची विक्री 6.9 टक्क्यांनी घसरून 103,435 वाहनांवर आली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर निर्यातीत 29.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत घट

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जानेवारी 2021 मध्ये एकूण 39,148 वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कंपनीने केलेल्या विक्रीच्या तुलनेत ही सुमारे 25.4 टक्के घट आहे. दरम्यान महिंद्राच्या एकूण प्रवासी वाहनांची विक्री 4 टक्क्यांनी वाढून 20 हजार 634 मोटारींवर आली आहे. तर शेतीच्या उपकरणांची विक्रीदेखील वाढली आहे. शेतीच्या उपकरणांच्या विक्रीत 50 टक्क्यांची वाढ होऊन यंदा जानेवारीत महिंद्राने 34,778 उपकरणांची विक्री केली आहे.

टाटाच्या विक्रीत 28 टक्क्यांनी वाढ

टाटा कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 45 हजार 252 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटाने यंदा जानेवारी महिन्यात 57 हजार 742 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. टाटाच्या कार्सची विक्री दुपटीने वाढली आहे. जानेवारीमध्ये टाटाच्या 26 हजार 978 कार्सची विक्री झाली आहे. मात्र टाटाच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 15 टक्क्यांची घट झाली आहे.

ह्युंदायच्या विक्रीतही वाढ

ह्युंदाय इंडियाने देशांतर्गत मार्केटमध्ये यंदा जानेवारी महिन्यात 52 हजार 5 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. तर 8 हजार 100 वाहनांची निर्यात केली आहे. म्हणजेच ह्युंदाय इंडियाने 60105 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. ह्युंदाय इंडियाच्या एकूण विक्रीत 15.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. ह्युंदाच्या देशांतर्गत विक्रीत 23.8 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर निर्यातीत मात्र 19 टक्क्यांची घट झाली आहे.

वॉल्वो आयशर

वॉल्वो आयशरची जानेवारीमध्ये एकूण विक्री 2.3 टक्क्यांनी वाढून 5 हजार 673 युनिट्स राहिली. देशांतर्गत वाहन विक्रीतही 1.9 टक्क्यांनी वाढ होऊन 4 हजार 871 वाहनांची विक्री झाली. तर वॉल्वोच्या वाहनाच्या निर्यातमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा

Vehicles scrapping Budget 2021: जुन्या वाहनांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, 5 वर्ष जास्त काळ चालवू शकाल गाडी

केवळ 69 हजार डाऊन पेमेंट, Volkswagen Polo तुमच्या घरात, EMI किती?

(January car sales of these companies including Maruti, Tata and hyundai increased; know details)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.