केवळ 69 हजार डाऊन पेमेंट, Volkswagen Polo तुमच्या घरात, EMI किती?

जर्मन कार कंपनी फॉक्सवेगन पोलो (Volkswagen Polo) ही लोकप्रिय कारमध्ये गणली जाते. कारचा लूक आणि फीलमुळे तिला वाढती मागणी आहे.

केवळ 69 हजार डाऊन पेमेंट, Volkswagen Polo तुमच्या घरात, EMI किती?
Volkswagen Polo
सचिन पाटील

|

Jan 30, 2021 | 2:20 PM

मुंबई : जर्मन कार कंपनी फॉक्सवेगन पोलो (Volkswagen Polo) ही लोकप्रिय कारमध्ये गणली जाते. कारचा लूक आणि फीलमुळे तिला वाढती मागणी आहे. पोलो जवळपास एक दशकापासून हॅचबॅक सेगमेंटमध्ये (volkswagen polo hatchback) आपली पकड बनवून आहे. कंपनी लवकरच नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे.

जर तुम्ही ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. केवळ 69 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये या कारचं बेसिक मॉडेल (1.0 MPI Trendline Petrol) घरी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी पाच वर्षांच्या मुदतीच्या कर्जाची तरतूद आहे.

या कारची किंमत 6.1 लाख रुपये (ऑन रोड किंमत नवी दिल्ली) आहे. जर तुम्ही 69 हजार रुपये डाऊन पेमेंट केलं, तर 6 लाख 25 हजार 701 रुपयांचं लोन घ्यावं लागेल. यावर 9.8 टक्के व्याजदर लागू होईल. यानुसार पाच वर्षात तुम्हाला 7 लाख 93 हजार 980 रुपये बँकेला अदा करावे लागतील. यामध्ये 1 लाख 68 हजार 279 रुपये केवळ व्याज असेल. यानुसार दर महिन्याचा हप्ता 13 हजार 233 रुपये इतका असेल.

जर तुम्हाला EMI चा भार थोडा कमी करायचा असेल, तर तुम्हाला कर्जाची मुदत वाढवून घ्यावी लागेल. जर सात वर्षांसाठी कर्ज घेतलं तर या कर्जाची रक्कम 6 लाख 25 हजार 701 रुपये असेल. ती सात वर्षात भागवावी लागेल. यावरही 9.8 टक्के व्याजदर लागू होईल.

सात वर्षात व्याजासह 8 लाख 67 हजार 132 रुपयांचा परतावा बँकेला करावा लागेल. यामध्ये 2 लाख 41 हजार 431 रुपये व्याज भरावं लागेल. तर मासिक हप्याची रक्कम 10 हजार 323 रुपेय इतकी असेल.

टीप : वरील माहिती कार कंपनीच्या वेबसाईटवर आधारित आहे. सविस्तर माहितीसाठी कंपनीशी संपर्क साधा

संबंधित बातम्या 

Special Story : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स   

Special Stroy: भूकंपामुळे सुरु झाली ‘ही’ कार कंपनी; आता विकतेय जगात सर्वाधिक कार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें