‘या’ कारणामुळे नव्या कार खरेदीवर मिळणार 5 टक्के डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा

जुन्या गाड्या असलेल्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. | Discount on new car purchase

'या' कारणामुळे नव्या कार खरेदीवर मिळणार 5 टक्के डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा
Nitin Gadkari
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 10:04 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आखलेल्या व्हेईकल स्क्रॅप्रिंग धोरणामुळे (Vehicle Scrapping Policy) ग्राहकांना एक मोठा फायदा होणार आहे. या धोरणानुसार तुम्ही तुमची जुनी गाडी भंगारात देऊन नवी गाडी खरेदी केली तर तुम्हाला नव्या कारच्या खरेदीवर 5 टक्के सूट (Car discount) मिळेल. केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. (Vehicle Scrappage Policy Replace the old car with a new one, Special discount from government)

नितीन गडकरी यांच्या या घोषणेनुसार ग्राहकाने जुनी कार स्क्रॅप केल्यास वाहन कंपनीकडून संबंधित ग्राहकाला कार खरेदीवेळी पाच टक्क्यांची सूट (Rebate from automakers) मिळेल. त्यामुळे जुन्या गाड्या असलेल्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मोदी सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पावेळी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 20 वर्षांपेक्षा जुन्या खासगी वाहनांसाठी फिटनेस टेस्ट करावी लागणार आहे. तर व्यावसायिक वाहनांसाठी ही कालमर्यादा 15 वर्षे इतकी आहे. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी सध्या ऐच्छिक आहे.

जुन्या गाड्यांचं काय करायचं?

स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये 15 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या रस्त्यांवरुन हटवण्याची तरतूद होती, ती आता रद्द करण्यात आली आहे. परंतु अशा जुन्या गाड्या चालवायच्या असतील तर त्या गाडीच्या मालकाला दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र काढावं लागणार आहे. तसेच रजिस्ट्रेशन रिन्यू (नूतनीकरण नोंदणी) करावी लागेल. रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठीचे शुल्क तिप्पट करण्यात आले आहे. त्यामुळे जुनी वाहनं वापरत असलेल्या वाहनधारकांना नवीन वाहन घेणं अधिक सोयीस्कर वाटेल. परिणामी रस्त्यांवर नवी वाहने धावतील.

टॅक्समध्ये सूट देण्याची योजना

संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, मोटार कंपन्यांची अशी मागणी आहे की, नवीन पॉलिसी काही दिवसांसाठी पुढे ढकलावी, जेणेकरुन आगामी फेस्टिव्ह सीजनमध्ये होणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर त्याचा परिणाम होणार नाही. तसेच केंद्र सरकार जे वाहनधारक त्यांचे जुने वाहन स्क्रॅप करुन नवीन वाहन घेतील, अशा वाहनधारकांसाठी नव्या वाहनाच्या खरेदीदरम्यान रजिस्ट्रेशन चार्ज आणि रोड टॅक्समध्ये (Road Tax) सूट देण्याची योजना आखत आहे.

सेल्फ ड्राईव्ह टेस्टमध्ये फेल ठरल्यास दंड

आगामी काळात वाहनांच्या सेल्फ ड्राईव्ह फिटनेस चाचण्या या ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारलेल्या संस्थांच्या माध्यमातून पार पडतील. त्यासाठी सरकार खासगी भागीदारांना आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी मदत करेल. सेल्फ ड्राईव्ह टेस्टमध्ये फेल ठरणाऱ्या वाहनांकडून दंड आकारला जाईल.

संबंधित बातम्या:

9 मार्चला नव्हे ‘या’ दिवशी लाँच होणार बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace, बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी

सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर

Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी

(Vehicle Scrappage Policy Replace the old car with a new one, Special discount from government)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.