AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KTM ने भारतात लाँच केली सायकल; किंमत हिरो स्प्लेंडरच्या बरोबरीची! जाणून घ्या, असे काय आहे विशेष..

KTM शिकागो 271: Ninty One Cycle ने आपली नवीन सायकल लॉन्च केली आहे. KTM शिकागो डिस्क 271 सायकल असे त्याचे नाव आहे. या KTM सायकलची किंमत 63000 रुपये ठेवण्यात आली आहे.

KTM ने भारतात लाँच केली सायकल; किंमत हिरो स्प्लेंडरच्या बरोबरीची! जाणून घ्या, असे काय आहे विशेष..
KTM Cycle
| Updated on: Apr 27, 2022 | 2:59 PM
Share

मुंबई :  KTM शिकागो डिस्क 271 बाइक भारतात मंगळवार, 26 एप्रिल रोजी लॉंच करण्यात आली आहे. Ninty One Cycle साईडने KTM सोबत एक विशेष भागीदारी (Special partnership) केली आहे, ज्याचा वापर KTM सायकल भारतात विकण्यासाठी केला जाईल. ही सायकल कंपनीने तीन वेगवेगळ्या फ्रेम आकारात सादर केली आहे, जी ग्राहकांच्या मागणीनुसार असेल. 15 किलो वजनाच्या या सायकलचे त्याच्या वर्गातील सर्वात हलके मॉडेल म्हणून वर्णन करण्यात आले आहे. कंपनीच्या मते, कमी अंतरावर सायकल चालवणाऱ्या (Cyclists) लोकांसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. कंपनीच्या मते, “भारतात सायकल चालवणे वेगवेगळ्या वयोगटांसाठी सामान्य आहे. आता गरीब आणि श्रीमंत असा भेद सायकल चालकांमध्ये राहीलेला नसून, सर्वच वर्गात सायकलींगचा वापर वाढला आहे. विविध सामाजिक पार्श्वभूमी आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेले लोक त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा आणि तंदुरुस्तीचा एक भाग (Part of fitness) म्हणून सायकलींचा अवलंब करत आहेत. यामुळे, सायकलचे मार्केट प्रचंड वेगाने विकसित होत आहे.

तीन फ्रेम आकारात उपलब्ध

ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी ही बाईक तीन फ्रेम आकारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त 15 किलो वजनाची, ही सायकल त्याच्या विभागातील सर्वात हलकी मॉडेल म्हणून वेगळी आहे. ते वाहून नेणे खूप सोपे आहे. कमी वजनामुळे ते अतिशय आरामदायी पद्धतीने चालवता येते.

फिटनेससाठी सायकलिंगला उपयुक्त

कंपनीच्या म्हणण्यानुसार दैनंदिन गरजांनुसार त्याची रचना करण्यात आली आहे. सायकलस्वारही फिटनेससाठी याचा वापर करू शकतात. हे कोणत्याही वयोगटातील लोक ऑपरेट करू शकतात. हे सर्व वयोगटातील रायडर्ससाठी डिझाइन केलेले आहे. सध्या वेगवेगळ्या वर्गांकडून सायकलिंगचा अवलंब केला जात आहे, हे लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे.

हिरो बाईक इतकी किंमत

हिरो स्प्लेंडर बाईकची भारतीय मोटरसायकल बाजारात लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही, ज्याची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 69,380 रुपये आहे. त्याच वेळी, KTM शिकागो डिस्क 271 सायकलची किंमत देखील जवळपास 63 हजार रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की शिकागो डिस्क 271 ही एक नवीन MTB बाईक आहे जी मजबूत TL सुसंगत रिम्ससह येते.

काय आहे विशेषता

नाइण्टी वन सायकल्सची भारतातील केटीएम सायकल्ससोबत खास भागीदारी आहे. सायकल TL सुसंगत रिम्सने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की शिकागो डिस्क 271 ही नवीन MTB बाईक आहे. मजबूत TL कंपॅटिबल रिम्ससह सुसज्ज, KTM लाइन रायझर 680mm हँडलबार प्रामुख्याने माउंटन बाइकिंगसाठी डिझाइन केलेले आहे. याशिवाय, मॉडेलच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये SCHWABLE 27.5″ ऑल-टेरेन टायर्सचा समावेश आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.