वेगेवेगे धावू नि मुंबईला जाऊ, ‘डेक्कन क्वीन’ सोबत लुनाची गाजलेली रेस; Luna ने अशी जिंकली शर्यत

Luna defeated Deccan Queen in Race : कायनेटिक मोटर्सच्या 50 सीसी लुना मोपेडने भारताच्या दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती आणली होती. सायकलवरुन भारतीय चाकरमानी पेट्रोलवरील दुचाकीवर आला होता. अहमदनगर हे त्याकाळी या क्रांतीचे केंद्रबिंदु होते. या लुना मोपेडने डेक्कन क्वीन या त्याकाळच्या वेगवान रेल्वेला धोबीपछाड दिली होती, काय होता तो किस्सा, काय होती कमाल...

वेगेवेगे धावू नि मुंबईला जाऊ, 'डेक्कन क्वीन' सोबत लुनाची गाजलेली रेस; Luna ने अशी जिंकली शर्यत
Luna ने Deccan Queen ला दिली धोबीपछाड
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 1:55 PM

आपल्याला ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट आपण कितीदा तरी ऐकली आहे. पण एका मोपेडने रेल्वेला धोबीपछाड दिली हा किस्सा कदाचित तुमच्या कानावर कधी आला नसेल. काहींनी तो वाचला पण नसेल. तर काही जण कदाचित त्याचे साक्षीदार असतील. सोशल मीडियावर सहज नजर फिरवली तर काहींच्या लेखणीतून हा किस्सा चितरला आहे. कायनेटिक समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया यांनी त्यांच्या LinkedIn वर याविषयीची एक आठवण शेअर केली होती. ती पुन्हा समोर आली. एका साध्या मोपेडने डेक्कन क्वीन या रेल्वेला कशी धोबीपछाड दिली असेल याचे जितके कौतुक तितकचं या किस्साविषयी इंटरनेटच्या मायाजालात डोकावलो तर बरेच धागेदोरे मिळाले. काय आहे किस्सा, कशी दाखवली लुना मोपेडने कमाल?

अहमदनगर येथून श्रीगणेशा

निजामशाहीची राजधानी असलेले अहमदनगर हे पुण्याजवळील शहर. व्यापार-उद्यामामुळे या शहराचे जगातील अनेक भागाशी संबंध होता. अनेक उद्योजकांनी या शहराला नवीन ओळख निर्माण करुन दिली. त्यात फिरोदिया, धूत, सारडा यांची नावं त्याकाळी प्रमुख होती. फिरोदिया कुटुंबाने कायनेटिक नावाची कंपनी सुरु केली. धूत कुटुंबियाने व्हिडिओकॉन ही कंपनी छत्रपती संभाजीनगरला सुरु केली. त्यात फिरोदिया यांच्या लुनाने देशात दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती आणली. देशाला सायकलवरुन पेट्रोलच्या लुना मोपेडवर गती दिली. विशेष म्हणजे पेट्रोल संपल्यावर ही दुचाकी सायकलप्रमाणे वापरता येत असल्याने मध्यमवर्गाचा तिच्यावर कोण जीव जडला.

हे सुद्धा वाचा

कायनेटिक कंपनीचा इतिहास

फिरोदिया कुटुंबातील हस्तीमल फिरोदीया हे त्यावेळी एसटी महामंडळाच्या दापोडातील वर्कशॉपमध्ये इंजिनिअर होते. त्यांनी नवलभाऊ, मोतीभाऊ यांच्या मदतीने कायनेटिक कंपनीचा मुहुर्तमेढ रोवली. अहमदनगरमध्ये त्याकाळी ही कंपनी स्थापन झाली. त्याकाळी नगरला कोणत्याही औद्योगिक सुविधा नव्हत्या. पण कायनेटिक नगरसाठी मैलाचा दगड ठरली. कायनेटिकमुळे इतर छोटे-मोठे उद्योजक तयार झाले. हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला. कायनेटिक म्हणजे त्यावेळेचा मेक इन इंडियाचा स्टार्टअप होता.

चल मेरी लुना

भारताची पहिली मोपेड कायनेटिक समूहाचे चेअरमन अरुण फिरोदिया यांनी आणली. फिरोदियांच्या कायनेटिक समूहाने जपानच्या होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली. इटालियन प्याजिओच्या चिआओ नावाच्या दुचाकीची ही लायसन्स कॉपी होती. 1972 मध्ये ही मोपेड भारतात सादर झाली. आल्या आल्याच या मोपेडने बाजारात धमाल उडवून दिली. सायकलला उत्तम पर्याय म्हणून तिने बाजारपेठ काबीज केली. सुरुवातीला ही मोपेड 2 हजार रुपयांच बाजारात आली होती. त्यावेळच्या ओबडधोबड रस्त्यावर ही दुचाकी कितपत कमाल दाखवेल असा सर्वांनाच प्रश्न पडला होता. 50 किलो वजनाची ही बाईक सर्वांवर भारी ठरली. तिने कमाल केली.

लुनाने डेक्कन क्वीनला दिली धोबीपछाड

दख्खनची राणी डेक्कन क्वीन लवकरच शंभरची होणार आहे. 1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीन सुरु झाली. मुंबई-पुणे-मुंबई असा तिचा नित्याचा प्रवास. पुणेकर चाकरमान्यांना वेळेत मुंबईत पोहचवणे आणि परतीच्या प्रवाशात त्यांना पुण्यात पोहचण्याचे काम ती अव्याहतपणे करत आहे. डेक्कन क्वीन ही वाफेच्या इंजिनवर धावलीच नाही. तर पहिल्या दिवासपासून इलेक्ट्रिक इंजिनाच्या मदतीने तिने अंतर कापले. देशातील पहिली डिलक्स रेल्वे, पहिली सुपरफास्ट रेल्वे, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी रेल्वे, अशा अनेक बिरुदावली तिच्या नावावर आहे. पण 50 सीसी लुनाकडून पराभवाचा विक्रम पण तिच्या नावावर नोंदवला गेला आहे.

लुना दणकट तर आहेच. पण ती वेगवान असल्याचा त्यांचा दावा होता. त्यासाठी त्यांनी एक अचाट प्रयोग करण्याचे ठरवले. डेक्कन क्वीनसोबत त्यांनी 50 सीसी लुनाची शर्यत लावली. अर्थात त्यावेळी सर्वांनीच त्यावर अविश्वास दाखवला. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा अनेकाचा गैरसमज होता. पण अरुण फिरोदिया हे दाव्यावर ठाम होते. या शर्यतीचा दिवस ठरला. फिरोदिया यांच्या विनंतीवरुन राज्याचे तत्कालीन विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक यांनी शर्यतीला हिरवा झेंडा दाखवला. सकाळी ठीक 7:20 वाजता डेक्कन क्वीन पुणे स्टेशनवरुन सुटली. त्याचवेळी कायनेटिकच्या कर्मचाऱ्याने लुना दामटली.

त्यावेळी मुंबई-पुणे हा जुना महामार्ग होता. आता सारखा एक्सप्रेस हायवे, द्रुतगती महामार्ग नव्हता. अर्थात त्यावेळी वाहनांची संख्या पण मोठ्या प्रमाणात नव्हती. पण या महामार्गावर वळण रस्ते आणि मोठे घाट होते. इतके मोठे आव्हान असताना ही लुना लोणावळ्याला तरी पोहचेल का अशी शंका त्यावेळी पुणेकर व्यक्त करत होते. त्यावेळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला इतर रेल्वे 5 तास घेत असत तर डेक्कन क्वीन हेच अंतर पावणे तीन तासात कापत असे. त्यामुळे पुणेकरांच्या दाव्यात दम वाटत होता. भारतातील सुपरफास्ट ट्रेनसमोर ही लुना कशी टिकेल ही शंका वाजवी होती. दादर येथे मुंबईचे पोलीस आयुक्तांना सुद्धा हजर राहण्याची विनंती करण्यात आली होती.

अरुण फिरोदिया यांनी लुनामध्ये काही बिघाड झाला. गडबडीत लुनास्वार पडला. लुना बंद झाली तर अशावेळी खास सोय म्हणून एक कार सुद्धा लुनाच्या पाठोपाठ पाठवली होती. त्यावेळी ही घटना सर्वांनाच अचंबित करणारी होती. तिची एकच चर्चा मुंबई-पुणेच नाही तर सगळीकडे सुरु होती. पण लुना सुसाट होती. लुनास्वार जीव तोडून तिला हाकत होता. त्याला कसलेच भान नव्हते. त्याला डेक्कन क्वीनपेक्षा कमी कालावधीत दादर गाठायचे होते.

लुना जेव्हा मुंबईत दाखल झाली. तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण डेक्कन क्वीन ही वक्तशीर होती. तिची स्टेशनवर येण्याची वेळ झालेली नव्हती. पण लुना मुंबईत दाखल झाली होती. अरुण फिरोदिया यांच्या विश्वासावर लुना खरी उतरली. डेक्कन क्वीन दादरला दाखल होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर लुना पोहचली होती. हा सोहळा बघण्यासाठी त्यावेळी तत्कालीन माध्यम प्रतिनिधी हजर होते. या घटनेची वार्ता देशभर पसरली. डेक्कन क्वीन सारख्या त्यावेळेच्या सुपरफास्ट रेल्वेला हरवल्यानंतर ‘चल मेरी लुना’ हे कायनेटिकचे ब्रीदवाक्य अनेकजण भाग मेरी लुना असे मिष्कीलपणे म्हणू लागले.

‘समय बचाये’ हे ब्रीदवाक्य ठरवले खरे

या शर्यतीविषयी अरुण फिरोदिया यांची एक मुलाखत आम्हाला डोमीन-बी डॉट कॉम या संकेतस्थळावर मिळाली. ही मुलाखत 1 डिसेंबर 2014 रोजीची आहे. त्यात त्यांनी डेक्कन रेल्वे आणि लुनाचा किस्सा अधोरेखित केला आहे. Innovation on Two Wheels या त्यांच्या पुस्तकासंबंधी आणि एकूणच जीवनपटाविषयी ही मुलाखत होती. त्यात फिरोदिया यांनी डेक्कन क्वीन आणि लुना यांच्यातील शर्यतीची त्यांनी माहिती दिली. समय बचाये, पेट्रोल बचाये, असा विश्वास कायनेटिक समूहाने लुनाच्या विक्री दिला होता. त्याचा खरेपणा तपासण्यासाठी या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलीस आयुक्त त्यावेळी दादर स्टेशनवर उपस्थित होते. डेक्कन क्वीन येण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर लुना पोहचली. त्यावेळी एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. लोकांनी जल्लोष साजरा केल्याची आठवण फिरोदिया यांनी या मुलाखती दरम्यान सांगितली. समय बचाये, या ब्रीदवाक्यावर कायनेटिक लुना खरं उतरल्याचा विश्वास फिरोदियांच्या डोळ्यातून व्यक्त होत होता.

इंटरनेटच्या मायाजालात आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे मात्र मिळाली नाहीत. ही शर्यत नेमकी कोणत्या दिवशी झाली. ज्याने ही लुना हाकली ती व्यक्ती कोण होती. या मुलाखतीतून जी कार लूनाच्या पाठीमागे होती, त्यात फिरोदिया असल्याचे समजते. त्यावेळी पुण्यात आणि मुंबईत अजून इतर कोणी प्रतिष्ठित व्यक्ती हजर होती का? त्यावेळचे पोलीस आयुक्त कोण होते? माध्यमांनी ही बातमी छापली. तर त्यासंबंधीची कोणतीही माहिती इंटरनेट शोध मोहिमेत मिळत नव्हती. यासंबंधीचे छायाचित्र पण मिळाली नाही. मग आम्ही थेट कायनेटिक कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ई-मेल आयडीवर याविषयीची विचारणा केली. त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. मग आम्ही फिरोदिया कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सोशल मीडियावर मॅसेजिंगद्वारे आमच्या जिज्ञासेला उत्तर मिळते का? याची चाचपणी केली. पण याविषयी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पण डेक्कन क्वीनचा पराभव करणारी लुना आणि तिचा हा किस्सा जनमाणसांच्या मनावर कोरला गेला आहे, हे नक्की. त्यावेळी जे या सोहळ्याला उपस्थितीत असतील त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले असेल हे नक्की.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.