AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेड इन इंडिया OLA स्कूटर प्लांटमध्ये लवकरच उत्पादन सुरु, दरवर्षी 20 लाख गाड्या तयार होणार

आघाडीची कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी असलेल्या ओलाने (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

मेड इन इंडिया OLA स्कूटर प्लांटमध्ये लवकरच उत्पादन सुरु, दरवर्षी 20 लाख गाड्या तयार होणार
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल! दोन दिवसांत तब्बल 1100 कोटींची कमाई
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 5:37 PM
Share

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Made in India OLA scooter plant to start production soon, Company will manufacture 20 lakh vehicles every year)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, देशातील आघाडीची कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी असलेल्या ओलाने (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. अशातच ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडीओ शेअर करुन ग्राहकांची उत्सुकता वाढवली आहे. तसेच त्यांनी कंपनीच्या तामिळनाडूमधील प्रोडक्शन प्लांटचं पहिल्या फेजमधील काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर प्रकल्प उत्पादनासाठी तयार आहे आणि प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला आहे. ओला समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी अलीकडेच तामिळनाडूमधील आगामी प्लांटचा एक नवीन व्हिडिओ ट्विट केला आहे, हा प्लांट लवकरच उत्पादनासाठी सज्ज होईल आणि त्यानंतर येथे आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू होऊ शकेल.

एकदा असेंबली लाइन सुरू झाल्यावर ते दरवर्षी दोन मिलियन (20 लाख) युनिट तयार करू शकतील, हे उत्पादन पुढील काळात 10 मिलियनपर्यंत वाढेल. असे म्हटले जातेय की, हा प्रकल्प चार महिन्यांच्या विक्रमी कालावधीत तयार करण्यात आला आहे. येथील काम सुरु झाल्यानंतर हा सर्वात प्रगत ‘हरित’ कारखाना बनेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. ओलाची ही फ्यूचर फॅक्टरी सुमारे 2400 कोटींच्या गुंतवणूकीसह तयार केली जात आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात भाविश यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि दावा केला की, “तुम्ही हे ट्विट वाचण्यापूर्वी ही स्कूटर 0-60 पर्यंत पोहोचते! (तुम्हाला हे ट्विट वाचायला जितका वेळ लागेल, त्यापेक्षा कमी वेळात ही स्कूटर 0-60 किलोमीटर प्रतितास इतका वेग घेईल). तयार आहात की नाही, एका नव्या क्रांतीसाठी! ओला इलेक्ट्रिक लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. या स्कूटरच्या किंमतीबाबत आणि फीचर्सबाबत या महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनीकडून खुलासा केला जाईल. कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर एक लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होऊ शकते. ही स्कूटर बाजारातील प्रतिस्पर्धी Ather Energy 450X ला जोरदार टक्कर देईल, असं म्हटलं जात आहे.

हायपर चार्जर नेटवर्क स्थापित करण्याची तयारी

ओला इलेक्ट्रिकने भारतीय शहरांमध्ये ‘हायपर चार्जर नेटवर्क’ उभारण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. या नेटवर्कमध्ये भारतातील 400 शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंट्सचा समावेश असेल. तर तामिळनाडूजवळील आगामी सुविधेसाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचीही कंपनीने घोषणा केली आहे.

10 हजार लोकांना रोजगार

हा प्लांट वर्षाला 20 लाख युनिट्सवर काम करणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याद्वारे सुमारे 10,000 नोकर्‍या निर्माण होतील. याला जगातील सर्वात मोठी ई-स्कूटर उत्पादन सुविधा म्हणून संबोधले जाईल, असादेखील दावा कंपनीने केला आहे.

याबाबत भाविश म्हणाले की, “आम्ही जूनपर्यंत हा कारखाना सुरू करू, ज्यामध्ये 20 लाख युनिट्स तयार करण्याची क्षमता असेल आणि पुढील 12 महिन्यांत हा कारखाना उभारल्यानंतर आम्ही रॅम्पवर उतरू. त्यानंतरच इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू होईल. कारखान्याचे काम जूनमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.”

इतर बातम्या

Ola कंपनी स्कूटरसह इलेक्ट्रिक कार लाँच करणार, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, अवघ्या काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112KM रेंज

(Made in India OLA scooter plant to start production soon, Company will manufacture 20 lakh vehicles every year)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.