AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, व्हिडीओ शेअर करत CEO म्हणाले, नव्या क्रांतीसाठी तयार व्हा!

आघाडीची कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी असलेल्या ओलाने (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

Ola इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, व्हिडीओ शेअर करत CEO म्हणाले, नव्या क्रांतीसाठी तयार व्हा!
ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर आता लवकरच बाजारात येणार
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 10:25 PM
Share

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Ola electric CEO shares video of electric scooter)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, देशातील आघाडीची कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी असलेल्या ओलाने (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. अशातच ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडीओ शेअर करुन ग्राहकांची उत्सुकता वाढवली आहे.

भविश यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि दावा केला की, “तुम्ही हे ट्विट वाचण्यापूर्वी ही स्कूटर 0-60 पर्यंत पोहोचते! (तुम्हाला हे ट्विट वाचायला जेवळा वेळ लागेल, त्यापेक्षा कमी वेळात ही स्कूटर 0-60 किलोमीटर प्रतितास इतका वेग घेईल). तयार आहात की नाही, एका नव्या क्रांतीसाठी! ओला इलेक्ट्रिक लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. या स्कूटरच्या किंमतीबाबत आणि फीचर्सबाबत या महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनीकडून खुलासा केला जाईल. कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर एक लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होऊ शकते. ही स्कूटर बाजारातील प्रतिस्पर्धी Ather Energy 450X ला जोरदार टक्कर देईल, असं म्हटलं जात आहे.

हायपर चार्जर नेटवर्क स्थापित करण्याची तयारी

ओला इलेक्ट्रिकने भारतीय शहरांमध्ये ‘हायपर चार्जर नेटवर्क’ उभारण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. या नेटवर्कमध्ये भारतातील 400 शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंट्सचा समावेश असेल. तर तामिळनाडूजवळील आगामी सुविधेसाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचीही कंपनीने घोषणा केली आहे.

10 हजार लोकांना रोजगार

हा प्लांट वर्षाला 20 लाख युनिट्सवर काम करणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याद्वारे सुमारे 10,000 नोकर्‍या निर्माण होतील. याला जगातील सर्वात मोठी ई-स्कूटर उत्पादन सुविधा म्हणून संबोधले जाईल, असादेखील दावा कंपनीने केला आहे.

याबाबत भाविश म्हणाले की, “आम्ही जूनपर्यंत हा कारखाना सुरू करू, ज्यामध्ये 20 लाख युनिट्स तयार करण्याची क्षमता असेल आणि पुढील 12 महिन्यांत हा कारखाना उभारल्यानंतर आम्ही रॅम्पवर उतरू. त्यानंतरच इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू होईल. कारखान्याचे काम जूनमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.”

इतर बातम्या

Ola कंपनी स्कूटरसह इलेक्ट्रिक कार लाँच करणार, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, अवघ्या काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112KM रेंज

(Ola electric CEO shares video of electric scooter)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.