थार लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, 2025 मॉडेल लवकरच लाँच होणार, डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल
महिंद्रा कंपनीच्या थार या एसयूव्हीने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. आता कंपनी आपले नवीन मॉडेल अनेक बदलांसह लॉन्च करणार आहे. यातील फीचर्स जाणून घेऊयात.

महिंद्रा कंपनीच्या थार या एसयूव्हीने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. आता कंपनी आपले नवीन मॉडेल अनेक बदलांसह लॉन्च करणार आहे. यापूर्वी हे अपडेटेड मॉडेल 2026 च्या पहिल्या सहामाहीत येणार होते मात्र आता ते लवकरच लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे मॉडेल सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. थार फेसलिफ्ट ही एसयुव्ही चाचणी दरम्यान अनेक वेळा दिसली आहे, याद्वारे या नव्या मॉडेलबद्दल माहिती समोर आला आहे. या कारमध्ये तुम्हाला कोणत्या खास गोष्टी मिळणार आहेत याची माहिती सविस्तर जाणन घेऊयात.
2025 महिंद्रा थार फेसलिफ्ट
नवीन महिंद्रा थार 2025 मध्ये थार रॉक्समधील डिझाइन आणि काही फीचर्स असणार आहेत. बाहेरील भागात या एसयूव्हीमध्ये डबल-स्टॅक्ड स्लॅट्ससह एक नवीन ग्रिल, नवीन डिझाइन असलेले हेडलॅम्प आणि अपडेट केलेला बंपर मिळेल. तसेच नवीन अलॉय व्हील्स सोडता, साइड प्रोफाइलमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. मागील बाजूस एक नवीन बंपर आणि नवीन डिझाइन केलेले टेल लॅम्प मिळतील. या नवीन मॉडेलमध्ये नवीन रंग पर्याय देखील मिळण्याची शक्यता आहे.
इंटीरियरमध्ये काय बदल असणार?
नवीन थारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, आतील अनेक फीचर्स अपग्रेड्स केले जाणार आहेत. 2025 महिंद्रा थार फेसलिफ्टमध्ये नवीनतम UI सपोर्टसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नवीन इलेक्ट्रिक स्टीअरिंग व्हील मिळणार आहे. तसेच 3 -दरवाज्यांच्या थारमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जर, 360-डिग्री कॅमेरा, अँबियंट लाइटिंग, रियर डिस्क ब्रेक्स आणि थार रॉक्समधील लेव्हल-२ ADAS सूट मिळण्याती अपेक्षा आहे.
इंजिन कसे असेल?
महिंद्रा थार 2025 मध्ये पूर्वीचेच 2.0-लिटर टर्बो पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो डिझेल आणि 2.2 -लिटर टर्बो डिझेल मिळणार आहे. पेट्रोल इंजिन 152 बीएचपीची पॉवर जनरेट करेल, तसेच 1.5 -लिटर आणि 2.2 -लिटर डिझेल इंजिन 119 आणि 130 बीएचपी पॉवर जनरेट करणार आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये समान 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गियर मिळतील. तसेच नवीन थारमध्ये RWD (रियर-व्हील ड्राइव्ह) आणि 4WD (फोर-व्हील ड्राइव्ह) या दोन्ही सिस्टीम उपलब्ध असणार आहेत. या मॉडेललाही आधीच्या मॉडेल्सप्रमाणे लोकप्रियता मिळण्याची शक्यता आहे.
