
मारुती सुझुकीच्या नेक्सा रिटेल चॅनेलला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने विटारा फँटम ब्लॅक एडिशन सादर केलं आहे. मर्यादीत एडिशन असून बाजारातील ह्युंदाई क्रेटाला तगडी टक्कर देणार आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारा फॅंटम ब्लॅक एडिशन अल्फा प्लस व्हेरिएंटवर आधारित आहे. नव्या काळ्या थीममुळे तिचा लूक पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि स्पोर्टी दिसत आहे. कंपनीच्या मते ‘ग्रँड विटारा फँटम ब्लॅक’ व्हेरिएंट प्रत्येक ड्राइव्हमध्ये स्टाईल हवे असलेल्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्हीमध्ये तिचे मूळ डिझाइन कायम आहे. पण त्यात काही विशेष कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, मार्केटिंग आणि विक्री पार्थो बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं की, या मर्यादित प्रकारात केवळ एक असाधारण लूकच नाही तर ग्रँड विटाराला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच फक्त 32 महिन्यांत तीन लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे.
ग्रँड विटारा फँटम ब्लॅक एडिशन अल्फा प्लस प्रकारावरच आधारित आहे. मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह ही गाडी येणार आहे. या एसयुव्हीची मूलभूत रचना कायम ठेवण्यात आली आहे. फक्त काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. या गाडीला बाहेरून पूर्ण मॅट ब्लॅक रंग असणार आहे. त्यामुळे ही गाडी आकर्षक दिसते. या रंगाला साजेसं आतलं इंटेरियर करण्यात आलं आहे. लेदर व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्ससह पॅनोरॅमिक सनरूफ आहे. केबिनमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 9-इंचाचा स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम आणि क्लॅरियन साउंड सिस्टम देखील आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने 360 व्ह्यू कॅमेरा आणि हेड अप डिस्प्ले आहे. तसेच कनेक्ट रिमोट एक्सेस देखील असणार आहे. यात 6 एअर बॅग, इलेक्ट्रिक स्टेबिलिटी प्रोग्राम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, हिल होल्ड कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेन्सर ,रिमांइडरसह 3 पॉइंट सीट बेल्ट आणि बरंच काही आहे.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा फँटम ब्लॅकमध्ये 1.5 हायब्रिड सेल्फ चार्जिंग हायब्रिड पावरट्रेन आहे. या सिस्टमला इंटेलिजेंट हायब्रिड सिस्टम म्हंटलं जातं. हे सिस्टम ई सीवीटी गिअरबॉक्सला जोडली गेली आहे. या इंजिनच्या माध्यमातून 114 बीएचपी आऊटपूट देते. या इंजिनमधून 91 बीएचपी आणि 122 एनएम टॉर्क जनरेट करते. तर मोटर 79 बीएचपी पॉवर आणि 141 एनएम टॉर्क जनरेट करते. मारूती कंपनीच्या दाव्यानुसार, या गाडीच्या मजबूत हायब्रिड वर्जनचं इंजिन क्षमता 27.97 किमी/लीटर आहे.