AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊस आणि मक्यानंतर बांबूवरही वाहने चालणार! देशातील पहिला खासगी प्रयोग

देशातील ऑटो क्षेत्र गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलं आहे. रस्त्यांसोबत वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे इंधनाची गरज भागवण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत. आता ऊस, मक्यानंतर बांबूच्या माध्यमातूनही इथेनॉल तयार केलं जाणार आहे. यासाठी खासगी प्लांट उभा केला जाणार आहे.

ऊस आणि मक्यानंतर बांबूवरही वाहने चालणार! देशातील पहिला खासगी प्रयोग
ऊस आणि मक्यानंतर बांबूवरही वाहने चालणार! देशातील पहिला खासगी प्रयोग Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 09, 2025 | 9:28 PM
Share

देशात गेल्या काही वर्षात इंधनाची मागणी झपाट्याने वाढली आहे. इंधनाची गरज पाहता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. मात्र असं असूनही इंधनावरची अवलंबता अजून काही कमी झाली नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसोबत इथेनॉल निर्मितीवर भर दिला जात आहे. ऊस आणि मक्यापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. असं असताना यात आता बांबूची भर पडणार आहे. यासाठी अरूणाचल प्रदेशमध्ये पहिला खासगी प्लांट टाकला जाणार आहे. अरुणाचल प्रदेशचे मंत्री ओजिंग तासिंग म्हणाले की, राज्य सरकार अक्षय ऊर्जा म्हणून बांबूचा वापर करून देशातील पहिला खाजगी 2G इथेनॉल प्लांट सुरू करण्याची योजना आखत आहे. स्वच्छ उर्जेमध्ये राज्याला पुढे नेण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. तासिंग यांनी या उपक्रमाचे वर्णन राज्याच्या हिरवळीच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक व्यासपीठ म्हणून केले. बांबूचा वापर हा राज्याच्या विपुल नैसर्गिक संसाधनांप्रती असलेल्या वचनबद्धतेशी परिपूर्ण सुसंगत आहे असे ते म्हणाले.

अरुणाचल प्रदेश शाश्वत जैव-औद्योगिक विकासात अग्रणी’ या विषयावरील परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिल्यानंतर राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री तासिंग यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली. वाहनांसाठी पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर केला जातो. इंधनाची आयात कमी करण्यासाठी हा पर्यात उत्तम आहे. सध्या ऊस आणि मका या सारख्या पिकांमधून इथोनॉलची निर्मिती केली जाते. त्यानंतर ते पेट्रोलमध्ये मिसळून वापरलं जातं. या माध्यमातून पेट्रोलचा वापर आणि प्रदूषण कमी करण्याचा हेतू आहे. “हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ तांत्रिक प्रगतीपेक्षा जास्त आहे. तो भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाचे नेतृत्व करण्याच्या अरुणाचल प्रदेशच्या संकल्पाचे प्रतीक आहे,”, असं तासिंग म्हणाले.

पेट्रोलमध्ये एका ठरावीक प्रमाणात इथेनॉलचं मिश्रण केलं जातं. म्हणजेच आता तुम्ही बाजारातून घेत असलेल्या इंधनात 20 टक्के इथेनॉल मिसळलेले असेत. बाजारात ई20 इंधन असून नवीन वाहनांवरही ई20 लिहिलेले असते. पेट्रोल आणि इथेनॉल इंजिनमध्ये जळते आणि त्यातून ऊर्जा निर्माण होते. इथेनॉल पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्यातून कमी प्रदूषण होते. तसेच इंधनाची आयातही कमी होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.