AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एथर कंपनीच्या ‘क्रूज कंट्रोल’ इलेक्ट्रिक स्कूटरची चर्चा! कंपनी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी झपाट्याने वाढली आहे. अनेक नावाजलेल्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. असं असताना एथर एनर्जी कंपनीने 450 सीरिज इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्रूज कंट्रोल फीचर्स देण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.

एथर कंपनीच्या 'क्रूज कंट्रोल' इलेक्ट्रिक स्कूटरची चर्चा! कंपनी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत
एथर कंपनीच्या 'क्रूज कंट्रोल' इलेक्ट्रिक स्कूटरची चर्चा! कंपनी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 07, 2025 | 9:39 PM
Share

एथर एनर्जी कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारात खळबळ उडवून देण्याच्या तयारीत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, एथर एनर्जी कंपनी क्रूज कंट्रोल स्कूटर आणण्याच्या तयारी आहे. कंपनी या स्कूटरची घोषणी कम्युनिटी डे ला करण्याची शक्यता आहे. हा दिवस 30 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. याच दिवशी कंपनी एन्ट्री लेव्हल मॉडेल लाँच करू शकते. या कार्यक्रमात मॉडेलमध्ये काही नवे फीचर्स पाहायला मिळाले आश्चर्य वाटायला नको. या मॉडेलमध्ये काही अपडेट येण्याची शक्यता आहे. या अपडेटबाबत अधिकृत माहिती नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एथच्या 450 सीरिजमध्ये क्रूज कंट्रोल फीचर असू शकते. सध्या 450 सीरिजचे तीन मॉडेल आहेत. यात 450s, 450X आणि 450 Apex चा समावेश आहे. यातील 450X आणि 450 Apex या मॉडेलला क्रूज कंट्रोल सुविधा मिळण्याची शक्यता आहे. पण हे अपडेट फक्त एथरस्टाक प्रो. सॉफ्टवेअर असलेल्या गाड्यांनाच मिळेल. पण हे फीचर काही भारतीय इलेक्ट्रिक स्कूटरसाठी नवं नाही. जून 2022 मध्ये ओला इलेक्ट्रिकने आपल्या एस1 सीरिजमधील मुव्ह ओएस 2.0 अपडेटच्या माध्यमातून क्रूज कंट्रोल जोडलं होतं. त्यानंतर मुव्ह ओएस 4.0 च्या माध्यमातून सक्षम केलं होतं.

Ather 450s मध्ये काय आहे खास

एथर 450 सीरिजमधील Ather 450s हे बेस मॉडेल आहे. या दोन बॅटरीचे पर्यात उपलब्ध आहेत. 2.9 किलोवॅट बेस मॉडेलची किंमत 1.23 लाख एक्स शोरूम आहे. ही गाडी 122 किमी चालते असा दावा आहे. तर 3.7 किलोवॅट टॉप मॉडेलची किंमत 1.43 लाख एक्स शोरूम आहे. ही गाडी 161 किमी रेंज देते असं सांगितलं जातं. या गाडीचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ही गाडी 0 ते 40 किमी तासाचा वेग फक्त 3.9 सेकंदात पकडते. यात टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सुविधा आहे. पण त्यासाठी अतिरिक्त 15 हजार मोजावे लागतात.

Ather 450X मध्ये काय आहे खास

एथरचं हे दुसरं मॉडेल आहे आमइ यात 2.9 किलोवॅटची बॅटरी असून 1.50 लाख रुपये एक्स शोरूम किंमत आहे. तर 3.7 किलोवॅट बॅटरी असलेल्या स्कुटरची किंमत 1.60 लाख एक्स शोरुम आहे. छोटी बॅटरी 126 किमी, मोठी बॅटरी 161 किमी रेंज देते. या गाडीचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. तसेच अवघ्या 3.3 सेकंदात 0 ते 40 कमिती वेग पकडते. Atherstack Pro ची किंमत 2.9 kWh व्हेरिएंटसाठी अतिरिक्त 17,000 आणि 3.7 kWh व्हेरिएंटसाठी अतिरिक्त 20,000 आहे. 2.9 kWh व्हेरिएंटला Atherstack Pro सोबत लोकेशन शेअरिंग आणि 5 वर्ष किंवा 50,000 किमी बॅटरी वॉरंटी मिळते, तर 3.7 kWh व्हेरिएंटला 7-इंच टचस्क्रीन, मॅजिक ट्विस्ट, चोरीची सूचना देणारी यंत्रणआ आणि इतर वैशिष्ट्ये मिळतात.

Ather 450 Apex मध्ये काय आहे खास

एथर 450 एपेक्सचं हे मर्यादीत एडिशन आहे. कंपनीने दहाव्या वर्धापनदिनी लाँच केलं होतं. हे मॉडेल फक्त 3.7 किलोवॅट बॅटरीसह येते. याची रेंज 157 किमी असून किंमत 1.84 लाख एक्स शोरूम आहे. याचा टॉप स्पीड 100 किमी प्रती तास आहे. ही गाडी 2.90 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडते.

कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर.
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.