AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki च्या गाड्या महागल्या, जाणून घ्या नव्या किंमती

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) सोमवारी आपल्या कारच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ सर्व मॉडेल्सवर दिसून येईल, कारण काही काळापासून कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ (Rise in Raw Material Prices) नोंदवली जात आहे.

Maruti Suzuki च्या गाड्या महागल्या, जाणून घ्या नव्या किंमती
Maruti Suzuki CarsImage Credit source: File
| Updated on: Apr 18, 2022 | 2:27 PM
Share

Maruti Suzuki Price Hikes: भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) सोमवारी आपल्या कारच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ सर्व मॉडेल्सवर दिसून येईल, कारण काही काळापासून कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ (Rise in Raw Material Prices) नोंदवली जात आहे. यावेळी कंपनीने सर्व मॉडेल्सवर 1.3 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. याआधी कंपनीने 6 एप्रिलला माहिती दिली होती की या महिन्यात किंमतींमध्ये वाढ होऊ शकते. मारुती सुझुकीने वेगवेगळ्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या प्रकारे किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत कंपनीने आतापर्यंत सुमारे 8.8 टक्के वाढ केली आहे. इतकंच नाही तर टाटा मोटर्स (Tata Motors) आणि इतर कंपन्यांनीही त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत.

कच्च्या मालाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, ज्यामुळे कारच्या किंमतीत भर पडत आहे, त्यामुळे कंपन्यांना किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

याआधीही कंपनीने किंमतीत वाढ केलीय

कंपनीने जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत जवळपास 8.8 टक्के वाढ केली आहे. इतकंच नाही तर टाटा आणि इतर ब्रँडसारख्या कंपन्यांनीही त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. खरं तर, बहुतेक कंपन्यांचे म्हणणे आहे की कच्च्या मालाच्या किंमती सतत वाढत आहेत, ज्यामुळे कारच्या किंमतीत भर पडत आहे. अशा स्थितीत कंपन्यांना दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला.

एप्रिलमध्ये अनेक कंपन्यांनी किमती वाढवल्या

या एप्रिलपासून टोयोटा, मर्सिडीज, ऑडी आणि इतर काही कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सनेही आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने सर्व मॉडेल्सच्या किमतीत ४ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. बीएमडब्ल्यू आणि ऑडीने कारच्या किमतीत 3.5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्सिडीजनेही 1 एप्रिलपासून किमतीत 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

3 ते 13 लाखांच्या रेंजमधल्या कार उपलब्ध

मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या कारसह अनेक प्रीमियम कार देखील विकते. कंपनीचं सर्वात स्वस्त मॉडेल म्हणजे मारुती अल्टो आहे, जी 5 सीटर कार आहे. याशिवाय कंपनीच्या एस-क्रॉस सारख्या कारही आहेत. मारुती भारतीय बाजारात 3.15 लाख रुपयांपासून ते 13 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या किंमतीतल्या कार विकते.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.