WagonR पासून Swift पर्यंतच्या मारुती मॉडेल्सवर 41,000 पर्यंतची सूट; ऑफर फक्त मार्चपर्यंतच…

मारुती सुझुकी अल्टोवरही घसघशीत सूट देण्यात येत आहे. मारुतीचे सर्वात जुने आणि प्रसिद्ध मॉडेल 796cc इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देण्यात आले आहे. हे पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही प्रकारांमध्ये देण्यात आले आहे. कंपनी Alto वर 31,000 पर्यंत सूट देत आहे. तथापि, त्याच्या मूळ STD प्रकारावर 11,000 पर्यंतच सूट आहे.

WagonR पासून Swift पर्यंतच्या मारुती मॉडेल्सवर 41,000 पर्यंतची सूट; ऑफर फक्त मार्चपर्यंतच...
WagnoR Car DiscountImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 7:52 PM

मुंबईः WagonR पासून ते Swift पर्यंत आता या मार्च महिन्यात मारुती (Maruti) या मॉडेल्सवर 41,000 पर्यंतची सूट देण्यात येत आहे, ही ऑफर फक्त मार्च महिन्यापर्यंतच आहे. तुम्ही जर भारतात राहत असाल तर आणि मार्च महिन्यात कार (Car) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या कारसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मारुती कंपनीकडून तुम्हाला वेगवेगळ्या ऑफरच्या (Offer) निमित्ताने फायदा करुन देत आहे. यामध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे.

सध्या भारतातील आघाडीची ऑटो कंपनी मारुती सुझुकीने मार्च महिन्यासाठी त्यांच्या Arena मॉडेल लाईन-अपवर 41,000 रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. जर तुम्ही मारुती प्रेमी असाल आणि या महिन्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कंपनी अनेक फायद्यांसह सवलत देत आहे. ज्यामध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज ऑफर यांचा समावेश असणार आहे. मात्र, मारुती सुझुकीच्या या ऑफरचा कोणत्याही सीएनजी मॉडेलवर लाभ मिळणार नाही.

नवीन व्हेरियंट लॉन्च

या ऑफरसोबतच, कंपनीकडून भारतात तिच्या सध्याच्या मॉडेलचे अपडेटेड व्हर्जन आणि नवीन व्हेरियंट लॉन्च करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे सध्या मॉडेलच्या खरेदीवर कंपनी चांगली सूट देत आहे. मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत नवीन Brezza लाँच करत आहे. तर मारुती कंपनी या महिन्यात चालू मॉडेलवर आता 22,000 रुपयांपर्यंतचे सूट आणि फायदे देत आहे.

मारुती वॅगनआर

मारुती सुझुकीने अलीकडेच WagonR ला दोन नवीन इंजिनसह अनेक वैशिष्ट्यांसर नवीन रंग आणि पर्यायांसह अपडेट केली आहे. मात्र, शेवटच्या मॉडेलवर वॅगनआरचे फायदे देण्यात आले आहेत. कंपनी WagonR च्या जुन्या 1.2-लीटर व्हेरियंटवर 41,000 तर आणखी दुसऱ्या मॉडेलवर 31,000 पर्यंतचे फायदे देत आहे.

मारुती सुझुकी अल्टो

या महिन्यात मारुती सुझुकी अल्टोवरही घसघशीत सूट देण्यात येत आहे. मारुतीचे सर्वात जुने आणि प्रसिद्ध मॉडेल 796cc इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देण्यात आले आहे. हे पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही प्रकारांमध्ये देण्यात आले आहे. कंपनी Alto वर 31,000 पर्यंत सूट देत आहे. तथापि, त्याच्या मूळ STD प्रकारावर 11,000 पर्यंतच सूट आहे.

मारुती सुझुकी S-Presso आणि Eeco

मारुती सुझुकी S-Presso च्या सर्व मॅन्युअलवर 31,000 ची सूट तर AMT प्रकारांवर 16,000 पर्यंतची सूट देण्यात येत आहे. यासह, मारुती सुझुकी Eeco च्या 5- आणि 7-सीटर दोन्ही कारवर तसेच कार्गो व्हॅन व्हेरियंटवर 29,000 रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत.

मारुती स्विफ्ट आणि सेलेरियो

मारुतीमधील तिसर्‍या प्रकारातील मारुती सुझुकी स्विफ्टच्या सर्व मॅन्युअल प्रकारांवर 27,000 पर्यंतचे फायदे देत आहे, तर AMT प्रकारांवर 17,000 पर्यंतचा सूट आहे. यासह, Celerio कंपनीच्या सर्व प्रकारांवर 26,000 पर्यंतची सूट देण्यात येत आहे. Celerio 67hp, 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.

मारुती स्विफ्ट डिझायर

डिझायर सब-कॉम्पॅक्ट सेडान, हे मॉडेल कार निर्मितीमध्ये सर्वाधिक विकले गेले आहे. या मॉडेलचाही सवलतीच्या दरात आता समावेश करण्यात आला आहे. DZire च्या मॅन्युअल व्हेरियंटवर 27,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत असून AMT व्हेरिएंटवर 17,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

भारतात आज लॉन्च होणार नवीन 2022 MG ZS EV ; जाणून घ्या या कारचे स्पेशल फीचर्स

सिंगल चार्जवर 439 किमी रेंज? 2022 MG ZS EV बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

देशात इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला, पण सर्वाधिक पसंतीच्या टॉप 5 Electric Scooter कोणत्या?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.