मारुती सुझुकीने 3 प्रसिद्ध कारना केले स्वस्त, पाहा कोणत्या कारवर किती सुट ?
देशाची नंबर वन कार विक्री होणाऱ्या मारुती सुझुकी कार कंपनीने तिच्या अनेक प्रख्यात कार मॉडेलवर डिस्काऊंट जारी केले आहे. जानेवारी 2026 मध्ये या कारना खरेदी करण्यासाठी ग्राहकांना संधी आहे.

भारतीय बाजारात सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी २०२६ साठी तिच्या नेक्सा मॉडेलवर मोठी सुट जाहीर केली आहे. यात मारुती सुझुकी इग्निस, मारुती सुझुकी Xl6 आणि कंपनीची प्रसिद्ध ऑफ रोडिंग एसयुव्ही मारुती सुझुकी जिम्नी सारख्या कारवर मोठी सुट मिळत आहे.
या ऑफरचा लाभ उठवून ग्राहक जानेवारी महिन्यात आपल्या हजारो रुपयांची बचत करु शकतात. डिस्काऊटच्या अधिक माहितीसाठी ग्राहक जवळच्या डिलरशिपशी संपर्क करु शकतात. चला तर पाहूयात कारवर किती डिस्काऊंट ऑफर आहे…
येथे पाहूयात डिस्काऊंट ऑफरची डिटेल्स
मारुती सुझुकी इग्निसच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटवर ग्राहकांना या ३५ हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे यात १५,००० रुपयांपर्यंतच्या कॅश डिस्काऊंटचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांना मारुती सुझुकी Xl6 वर ३३,००० रुपयांचे फायदे मिळत आहेत. मारुतीची प्रसिद्ध पॉप्युलर ऑफ रोडिंग एसयूव्ही मारुती सुझुकी जिम्नी वर ग्राहकांना या दरम्यान कमाल ३३,००० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. या ऑफरमध्ये २५,००० रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंटचा देखील समावेश आहे.
मारुती सुझुकीची अशी आहे प्लानिंग
नवीन वर्षात मारुती सुझुकीने भारतीय मार्केटमध्ये अनेक मॉडेल आणण्याची तयारी केली आहे. या शिवाय कंपनी आपल्या पॉप्युलर मॉडेल्सचे अपडेटेड व्हर्जन देखील लाँच करण्याची तयारी केली आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या अपकमिंग कारमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्टचा देखील समावेश आहे. मारुती ब्रेझा फेसलिस्ट कारला अनेकदा भारतीय रस्त्यांवर टेस्टींग दरम्यान पाहिले आहे. याशिवाय येणाऱ्या काळात कंपनी तिची प्रसिद्ध एसयुव्ही मारुती सुझुकी फ्रोंक्सला हायब्रिड पॉवरट्रेनसह लाँच करु शकते.
( डिस्क्लेमर: कारवर मिळलेला डिस्काऊंट आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि सोर्सच्या मदतीने सांगत आहे. तुमच्या शहराती डीलरकडे जाऊन याची नेमकी माहिती मिळेल. )
