AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती सुझुकीच्या 4 नव्या कार होणार लाँच, यादीत नवी ब्रेझा आणि वॅगन आर फेसलिफ्ट देखील

मारुती आपल्या चार नव्या कारना बाजारात आणणार आहे. यात ब्रेझा फेसलिफ्टसोबत वॅगन आरच्या थर्ड जनरेशनची सेकेंड फेसलिफ्ट देखील सामील आहे.सोबतच अपकमिंग कारच्या यादीत कंपनीच्या एकाानवीन इलेक्ट्रीक कारचा देखील समावेश आहे.

मारुती सुझुकीच्या 4 नव्या कार होणार लाँच, यादीत नवी ब्रेझा आणि वॅगन आर फेसलिफ्ट देखील
GRAND VITARA
| Updated on: Apr 07, 2026 | 6:15 PM
Share

मारुती सुझुकीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने बहुप्रतिक्षेनंतर आता फेब्रुवारीत आपली ई व्हीटाराला लाँच केली होती. कंपनीचे हे या वर्षाचे पहिले मॉडेल आहे. आता कंपनी चार नव्या कार बाजारात उतरवणार आहे. यात ब्रेझा फेसलिफ्टसोबत वॅगन आरच्या थर्ड जनरेशनच्या सेकेंड फेसलिफ्टचा देखील समावेश आहे. सोबतच अपकमिंग कारच्या यादीत कंपनीची एक नवीन इलेक्ट्रीक कारचा देखील समावेश आहे. चला या कारची माहिती पाहूयात…

ब्रेझा फेसलिफ्ट –

ब्रेझा फेसलिफ्ट संदर्भात ग्राहक खूप उत्साहित आहेत. कंपनीने यास मिड-सायकल अपडेट देणार आहे. या कारचे शानदार कॉस्मेटिक अपडेट देखील पाहायला मिळणार आहे. मारुती ब्रेझाच्या नव्या अपडेटमध्ये रिडिजाईन केलेल्या बंपर, नवीन रेडिएटर ग्रिल, रिवाईज्ड, एलईडी हेडलाईट्स आणि टेलसाईट्ससोबत नवीन १६ इंचाचे अलॉय व्हील्स पाहायला मिळू शकतात. मारुती सुझुकी या अपडेटसह ब्रेझामध्ये पॅनॉरमिक सनरुफ देखील ऑफर करु शकते. इंटेरिअरमध्ये तुम्हाला ९ इंचाच्या युनिटच्या जागी १०.१ इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आणि ड्रायव्हर साईडमध्ये इलेक्ट्रीक एडजस्टमेंटसोबत वेंटिलेटेड फ्रंट सीट देखील पाहायला मिळू शकते.

वॅगन आर –

मारुती सुझुकी थर्ड जनरेशन वॅगन आरचा दुसरा फेसलिफ्ट लाँच करु शकते. सध्याचे मॉडेल २०२२ पासून बाजारात आहे. आणि यास एका अपडेटची गरज आहे. मारुती सुझुकी रेडिएटर ग्रिलच्या डिझाईनमध्ये बदल करु शकते. सोबतच या कारला नव्या कलर ऑप्शनमध्ये देखील आणले जाऊ शकते. इंटेरिअरमध्ये तुम्हाला युएसबी टाईप-सी पोर्ट सारखे काही नवीन फिचर्स देखील पाहायला मिळू शकतात. सीएनजी व्हेरिएंटसाठी एक मोठा अपग्रेड पाहायला मिळू शकते. यात नवीन अंडरबॉडी सीएनजी फ्युअ टँक देखील मिळू शकतो. ज्यामुळे तुम्हाला एक मोठा बुट स्पेस पाहायला मिळू शकतो.

नवीन इलेक्ट्रीक एमपीव्ही –

तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी म्हणजे फेस्टीव्ह सिझनच्या ठीक आधी मारुती सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रीक एमपीव्ही लाँच करु शकते. ‘मारुती YMC’ कोडनेम असलेले हे मॉडेल मारुती ई व्हीटारावाल्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. तसेच तो किआ कॅरेन्स क्लॅव्हीस ईव्हीला टक्कर देईल. मारुती सुझुकी या इलेक्ट्रीक एमपीव्हीला दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर करेल. बेस व्हेरिएंटमध्ये 142 hp/193Nm चा फ्रंट मोचर आणि 48.8kWh चा एलएफपी बॅटरी पॅक असेल. तर टॉप व्हेरिएंटमध्ये 172 hp/193Nm चा फ्रंट मोटर आणि 61.1kWh च्या एलएफपी बॅटरी पॅक असेल. पहिल्या व्हेरिएंटची रेंज सुमारे 400 किलोमीटर आणि दुसऱ्या व्हेरिएंटची रेंज सुमारे 500 किलोमीटर असेल.

ग्रँट व्हीटाराचा फेसलिफ्ट –

मारुती सुझुकी सप्टेंबर 2022 मध्ये लाँच झालेल्या ग्रँट व्हीटाराचा फेसलिफ्ट व्हर्जन सादर करु शकते. फेसलिफ्टेड ग्रँड व्हीटारात नवीन बंपर, नवीन 17 इंच अलॉय व्हील, रिडिजाईन केलेले हेडलाईट्स आणि टेल लाईट्स, जेस्चर-कंट्रोल्ड पावर्ड टेलगेट, लेव्हल 2 एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टीम, 10.25 – इंचाचा डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम सारखे अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. इंजिन वा ट्रान्समिशनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.परंत अंडरबॉडीत लावलेला नवा सीएनजी टँक सीएनजी व्हेरिएंटमध्ये बूट स्पेसला चांगले बनवू शकतो.

Follow Us
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने...
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने....
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?.
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य.
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे......
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे.......
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची.