Car Review : MG Windsor Pro इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी कशी आहे? रियलमध्ये मिळतेय एवढी रेंज

एमजी मोटर्सने लाँच केलेल्या विंडसर प्रो ईव्हीची टीव्ही9ने एक्सक्लूसिव्ह रिव्ह्यू केली आहे. 449 किमी रेंजचा दावा असलेल्या या कारची वास्तव रेंज 320-350 किमी आढळली. शिलांगपर्यंतच्या प्रवासात कारचा परफॉर्मन्स चांगला होता, पण खराब रस्त्यांवर सस्पेन्शन थोडे कठोर वाटले.

Car Review : MG Windsor Pro इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी कशी आहे? रियलमध्ये मिळतेय एवढी रेंज
Mg Windsor Pro
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2025 | 6:30 PM

एमजी मोटरने जेव्हापासून Windsor लॉन्च केलीय तेव्हापासून इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये टाटा पंचपासून टाटा नेक्सॉनपर्यंतची हालत खराब झाली आहे. आता कंपनीने ग्राहकांच्या रेंज एंजायटी तक्रार दूर करून MG Windsor Pro लॉन्च केली आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये 449 किलोमीटर रेंजच्या दाव्यासोबत मिळत आहे. त्यामुळेच TV9ने या कारचा रिव्हू केला आणि खरोखरच ही कार एवढी रेंज देते का हे पाहिलं.

टीव्ही9च्या टीमने एमजी विंडसर प्रोद्वारे मेघालयची राजधानी शिलांग पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. विविधतेने नटलेल्या भारताच्या पूर्वेकडील या राज्यात आम्ही ढाब्यांवर थांबलो. जेवलो. या कारच्या टेस्टिंगसाठी आम्ही उमियम तलावापर्यंत गेलो. आणि या कारमध्ये काय काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नव्या कारमध्ये नवीन बदल

नव्या एमजी विंडसर प्रोमध्ये कंपनीने सर्वात मोठा बदल बॅटरी पॅकचा केला आहे. यात 52.9 kWh चे बॅटरी पॅक दिलं आहे. त्याशिवाय कॉस्मेटिक्समध्ये अधिक बदल नाहीये. फक्त कारच्या व्हीलला हेक्टरच्या अलॉय व्हीलचा लूक दिला आहे. तर कारमध्ये इलेक्ट्रिकल टेल गेट सुद्धा दिला आहे. बॅटरी पॅक वाढल्याने कारमध्ये बूट स्पेस कमी होईल. एमजी विंडसर ईव्हीच्या तुलनेत हे 25 लीटर कमी आहे.

या कारची सुरुवातीची किंमत 17.49 लाख रुपये आहे. तर बॅटरी एज ए सर्व्हिससोबत त्याची किंमत 12.49 लाख आहे. ही किंमत सुरुवातीच्या 8000 बुकिंगसाठी होती. पहिल्या 24 तासातच ही ऑफर पूर्ण झाली आहे. आता या कारच्या किंमतीत 60 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

MG Windsor Pro

वास्तवात मिळते एवढी रेंज

टीव्ही9 च्या व्हेंचर ऑटो9कडून या कारचा एक्सक्लूसिव्ह राइड रिव्ह्यू सीनियर जर्नलिस्ट नंद कुमार नायर यांनी केला आहे. त्यांनी या कारबाबतचे आपले अनुभव शेअर केले आहेत. शिलाँगच्या रस्त्यावरून विंडसर प्रोने जात असताना शहराच्या सौंदर्याचा आनंद घेतला. या नव्या कारने (रिव्ह्यूसाठी आलेल्या) प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करणं कठिणच होतं. डिझाईनच्या बाबतीत या कारची रोड प्रेजेंस दुसरी एसयूव्ही वा क्रॉसओव्हर सारखी बोल्ड नसेलही पण कंफर्टतेच्या बाबतीत अप्रतिमच आहे, असं नंद कुमार नायर यांनी म्हटलं आहे.

कारची राऊंड डिझाइन डोंगराळ भागातील छोट्या आणि अरुंद रस्त्यावरून कार फिरवण्यासाठी पुरेसा आहे. डोंगराळ भागात कर्व्सवर गाडी चालवण्याची मजाच काही और असते. मार्केटमध्ये ही कार Tata Curvvसाठी आव्हान ठरू शकते. मात्र, स्टिफ सस्पेन्शनने खराब रस्त्यांवर थोडा त्रास होऊ शकतो. कारचा साऊंड इन्सुलेशन अधिकच चांगला आहे.

Auto9ने एमजी विंडसर प्रोला फूल चार्ज केलं आणि सुमारे 200 किमी ड्राइव्ह पूर्ण केली. या दरम्यान कारची बॅटरी 62 टक्के संपली. त्यामुळे वाचलेल्या 38 टक्के बॅटरीने ही कार 120 किलोमीटर ते 150 किलोमीटरचा प्रवास करू शकते. अशा पद्धतीने रिअल वर्ल्डमध्ये या कारपासून तुम्हाला 320 ते 350 किलोमीटरची रेंज मिळण्याची शक्यता आहे. पण कारमधील टच स्क्रीनवर सर्व काही कंट्रोल करणं सोपं नाही. कारमध्ये फिजिकल बटन नसल्याची उणीव जाणवते.

MG Windsor Pro

Windsor सोबत MG ने लिहिला नवीन इतिहास

JSW MG Motors आजच्या काळात ऑटोमोटिव्ह जगातील सर्वात चांगली आहे. कंपनीने नवीन मार्ग पत्करले. तसेच नवीन सेगमेंटमध्ये जाण्यास कंपनी कचरली नाही. आज इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये कंपनीने नवीन इकोसिस्टिम बनवली आहे. कंपनीने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ऑल वुमन टीम बनवली आहे. त्यानंतर स्टार्टअप सिस्टमला सपोर्ट करून इलेक्ट्रिक व्हिकल्ससाठी एंड टू एंड सोल्यूशन तयार केलं. बॅटरी एज ए सर्व्हिस सारखे इनोव्हेशनमध्ये पहिल्यांदा वापरून पाहिलं. सर्वात आधी MG ZS EVसोबत EV मार्केटला टेस्ट केलं. आणि MG Comet सोबत एकदम नवीन कार सेगमेंटला टारगेट करून ग्राहकांना विचार करण्यास भाग पाडलं.

विंडसर कारने मोठ्या मोठ्या खेळाडूंना आश्चर्यचकित केलं आहे. ही कार टाटा मोटर्सच्या पंच आणि नेक्सॉन या दोन्ही मॉडेल्सवर भारी ठरली आहे. आता विंडसरमध्ये ADAS, उत्तम रेंज आणि प्रीमियम इंटिरियर्ससारखी सर्व वैशिष्ट्यं उपलब्ध आहेत आणि हा ब्रँड अधिक बळकट झाला आहे. टाटा पंच आणि टाटा नेक्सॉननंतर आता ही कार हुंडई क्रेटा ईव्ही आणि टाटा कर्व यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. खरं सांगायचं झालं, तर एमजीने टेक्नोलॉजी, इनोव्हेशन आणि धाडस यांचं असं पॅकेज सादर केलं आहे की ज्यामुळे ती भविष्यातील इलेक्ट्रिफिकेशन युगात एक आघाडीची खेळाडू ठरणार आहे!