बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर 400 किमी धावणार

MG Motors ने त्यांची बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट 2021 ही कार सोमवारी अधिकृतपणे भारतात लाँच केली आहे. (MG ZS EV 2021 facelift launched)

बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर 400 किमी धावणार
Mg Zs Ev 2021

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. तसेच यापूर्वीदेखील देशात काही इलेक्ट्रिक कार्स लाँच झाल्या आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कार निर्माती कंपनी MG Motors ने त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लाँच केली आहे. (MG ZS EV 2021 facelift launched at 20.99 lakh rupees, gets new battery pack within)

MG Motors ने त्यांची बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट 2021 ही कार सोमवारी अधिकृतपणे भारतात लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 20.99 लाख (एक्स शोरूम) रुपये असणार आहे. पूर्णपणे बॅटरीवर चालणारी ही कार कंपनीने 2020 च्या जानेवारीमध्ये लाँच केली होती. परंतु आता कंपनीने याच कारचं लेटेस्ट वर्जन लाँच केलं आहे. जुन्या कारच्या तुलनेत ही कार अपग्रेड करण्यात आली आहे. या कारमध्ये 44.5 kWh क्षमतेची हायटेक बॅटरी देण्यात आली आहे, जी 400 किमीपर्यंतची रेंज देते.

एमजी मोटर्स कंपनीने म्हटलं आहे की, ही बॅटरी प्रत्येक ऋतूमध्ये, वेगवेगळ्या तापमानांमध्ये तपासून पाहिली आहे. कंपनीला विश्वास आहे की, ही कार 300 ते 400 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. परंतु ही गोष्ट तुम्ही ती कार कुठे आणि कशी चालवताय? यावर अवलंबून आहे. या बॅटरीसह ही कार 8.5 सेकंदांमध्ये 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते आणि 143 PS देते.

दमदार फीचर्स

ZS EV ही कार दोन वेरिएंट्समध्ये सादर केली जाणार आहे. एक्साइट आणि एक्सक्लूसिव्ह अशी या वेरिएंट्सची नावं आहेत. या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 8 इंचांची इन्फोटेन्मेंट स्क्रीन, 6 एयरबॅग्स आणि फ्रंट ग्रिलवर ग्लो लोगो असे नेहमीचे फीचर्स देण्यात आले आहेत. सोबतच एक्सक्लूसिव्ह वेरिएंटमध्ये डुअल-पॅन पॅनोरमिक सनरूफ, लेदर सीट, पॉवर फोल्डेबल ORVM, रेन सेन्सिंग वायपर्स, सिक्स वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायवर सीट आणि i-स्मार्ट ईव्ही 2.0 कनेक्टेड कार फीचर्स दिले आहेत. एक्सक्लूसिव्ह वेरिएंटची किंमत 24.18 लाख रुपये इतकी आहे.

अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी

एमजी कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांनी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर एक्सपँड करणं सुरु ठेवलं आहे. तसेच प्रत्येक ZS EV युनिटसह ग्राहकांना वॉल चार्जिंग युनिट दिलं जाणार आहे. कंपनी या बॅटरी पॅकवर 8 वर्षांची वॉरंटी देत आहे. सोबतच कंपनीने 5 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी किंवा 1.50 लाख किलोमीटरची ऑफर दिली आहे. यासह कंपनीने पाच मोफत लेबर सर्विस, 5 रोड साइड असिस्टन्स आणि 5 वें चार्जिंगची सुविधा दिली आहे. कंपनी भारतातील 31 शहरांमध्ये त्यांच्या EV वाढवण्याची तयारी करत आहे.

सध्याच्या MG ZS EV मधील फीचर्स

ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा

Special Story : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स

दिल्ली सरकारचा मास्टर प्लॅन, ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची बचत होणार

2024 पर्यंत दिल्लीत विकली जाणारी दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार, केजरीवाल सरकारची जोरदार तयारी

(MG ZS EV 2021 facelift launched at 20.99 lakh rupees, gets new battery pack within)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI