Nissan च्या ‘या’ SUV वर तब्बल 80000 रुपयांचा डिस्काऊंट

निसान इंडियाच्या एका एसयूव्हीवर तब्बल 80 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:46 PM, 25 Jan 2021
Nissan च्या 'या' SUV वर तब्बल 80000 रुपयांचा डिस्काऊंट

नवी दिल्ली : निसान इंडियाच्या एका एसयूव्हीवर तब्बल 80 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. Nissan KICKS असं या एसयूव्हीचं नाव आहे. जानेवारी महिन्यात ही कार स्वस्तात खरेदी करण्याची नामी संधी ग्राहकांना मिळाली आहे. निसान इंडियाच्या या एसयूव्हीच्या बुकिंगवर तब्बल 80 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. ही सूट रोख, लॉयल्टी आणि एक्सचेंज बोनसच्या स्वरुपात देण्यात आली आहे. (Nissan Kicks last few days to save up to Rs 80000 on booking)

किक्सवर हा डिस्काउंट डीलर्सकडून दिला जात आहे. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत तुम्ही 80000 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह ही कार घरी घेऊन जाऊ शकता. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यानंतर गाड्यांच्या किंमती वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ज्यांना स्वस्तात कार खरेदी करायची आहे, त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी निसानची किक्स खरेदी करायला हवी.

जानेवारी महिन्यात निसान किक्सच्या बुकिंगवर डीलर्सकडून 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट देण्यात आला आहे. जर तुम्ही निसान किक्ससोबत तुमची जुनी कार एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला किक्सवर 50 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. ज्या ग्राहकाकडे आधीपासूनच निसानची एखादी कार आहे, अशा ग्राहकांना निसान किक्सच्या बुकिंगवर 20 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट देण्यात आला आहे. दरम्यान कंपनीने स्पष्ट केलं आहे की, ज्या डीलरशीपकडे फायनान्स लागू आहे, त्याच डीलरशीपकडे एस्सचेंज बोनस मिळेल.

दमदार इंजिनांचा पर्याय

निसान किक्सची एक्स शोरुम किंमत 9.49 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड, 4 सिलिंडर इंजिन 104hp पॉवर आणि 142Nm टॉर्क जनरेट करतं. तसेच यासोबत 5 स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. तसेच 1.3 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनाचा दुसरा पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन 154hp पॉवर आणि 254Nm टॉर्क जनरेट करतं. या इंजिनासह 6 स्पीड मॅनुअल किंवा 7 स्टेप CVT उपलब्ध आहे.

सेफ्टी फीचर्स

निसान किक्समध्ये 360 डिग्री पार्किंग कॅमरा, ड्युअल एयरबॅग्स, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट वॉर्निंग, सीटबेल्ट वॉर्निंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात या कारची ह्युंदाय क्रेटा, किआ सेल्टोस आणि रेनॉल्ट डस्टर या कार्ससोबत टक्कर सुरु आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : तुमचं वाहन 8 वर्षांपेक्षा जुनं आहे? मग भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’

15 वर्षांपासून भारतीय मार्केटवर राज्य करत असलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

अवघ्या 20 ते 40 हजारात सेकंड हँड Bajaj Avenger, V15, Super Splendor खरेदी करा!

(Nissan Kicks last few days to save up to Rs 80000 on booking)