Okinava ची डिस्क ब्रेक्ससह मोठे व्हील्स असलेली इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, सिंगल चार्जवर 150km रेंज

Okinava ची डिस्क ब्रेक्ससह मोठे व्हील्स असलेली इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, सिंगल चार्जवर 150km रेंज
Okinava Electric Scooter प्रातिनिधिक फोटो (फोटोः ओकिनावा वेबसाइट)

ओकिनावा (Okinava) हा ऑटो ब्रँड भारतात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्यामध्ये मोठे टायर आणि शानदार डिझाईन असेल. या स्कूटरचे नाव ओकिनावा ओकी90 (Okinawa Oki90) असे असू शकते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 26, 2022 | 2:35 PM

मुंबई : ओकिनावा (Okinava) हा ऑटो ब्रँड भारतात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्यामध्ये मोठे टायर आणि शानदार डिझाईन असेल. या स्कूटरचे नाव ओकिनावा ओकी90 (Okinawa Oki90) असे असू शकते. गुरुग्राममधील ही ईव्ही उत्पादक (EV manufacturer) कंपनी या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही स्कूटर लॉन्च करू शकते. या स्कूटरच्या टेस्टिंगदरम्यानचा फोटो नुकताच पाहायला मिळाला आहे. HT Auto ने या स्कूटरची माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की रोड टेस्ट दरम्यान एक इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) पाहायला मिळाली आहे, जी ओकिनावा स्कूटरसारखी दिसते.

स्पाय इमेज पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की हा प्रोटोटाइप पूर्णपणे तयार आहे. यासोबतच मोटारसायकल फिनिशिंगसह दिसली आहे. यामध्ये मोठ्या चाकांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे या स्कूटरचा लूक अधिक आकर्षक झाला आहे आणि या चाकाचा आकार 14 इंच इतका आहे. दोन्ही चाकांमध्ये डिस्कचा वापर करण्यात आला आहे. आत्तापर्यंतच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या तुलनेत ही चाके खूपच मोठी दिसतात.

पेंट डिटेल्स लपवले असले तरी या आगामी बाइकमध्ये लांबलचक शीट्स वापरण्यात आल्या आहेत, ज्यामुळे लोकांना आरामदायी आणि बसण्यासाठी अधिक जागा मिळेल. मात्र, सीट्सच्या आकारमानाची माहिती देणे शक्य नाही, कारण कंपनीने याबाबतची माहिती उघड केलेली नाही.

सिंगल चार्जवर 150 किमी रेंज

जर तुम्ही जुन्या रिपोर्ट्सवर नजर टाकली तर, ही स्कूटर रिमूवेबल लिथियम-आयन बॅटरीसह येईल, त्यासोबत यात एक फास्ट चार्जर देखील मिळेल. याचे फोटो पाहिले तर लक्षात येईल की, यात हब माउंटेडचा वापर करण्यात आलेला नाही. ही स्कूटर Okinawa चं प्रीमियम व्हर्जन असू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 80 किलोमीटर इतका असू शकतो. तसेच ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 150-180 किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जिओ-फेन्सिंग, नेव्हिगेशन आणि डायग्नोस्टिक्स सारखे फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर आणि सिंपल वन या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. कंपनीकडून आतापर्यंत या स्कूटरच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी, ही स्कूटर 1 लाख ते 1.20 लाख रुपयांच्या दरम्यान लाँच केली जाऊ शकते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार

(Okinava Electric Scooter Oki90 to launch in India, know features)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें