AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola पुढील वर्षी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरसह E-Bike लाँच करणार, जाणून घ्या सर्वकाही

ओला इलेक्ट्रिकने या वर्षी ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. या स्कूटरच्या वितरणास अद्याप सुरुवात व्हायची आहे. देशातील काही राज्यांमध्ये टेस्ट ड्राईव्ह मोहिम सुरु करण्यात आली आहे.

Ola पुढील वर्षी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरसह E-Bike लाँच करणार, जाणून घ्या सर्वकाही
Ola Electric Scooter
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 6:15 AM
Share

मुंबई : ओला इलेक्ट्रिकने या वर्षी ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. या स्कूटरच्या वितरणास अद्याप सुरुवात व्हायची आहे. देशातील काही राज्यांमध्ये टेस्ट ड्राईव्ह मोहिम सुरु करण्यात आली आहे. आता कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी पुष्टी केली आहे की, कॅब-अॅग्रीगेटर असलेली ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप बनली आहे. ही कंपनी पुढील वर्षापासून इलेक्ट्रिक मोटारसायकल आणि स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन सुरू करेल. अग्रवाल यांनी याआधी एका ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, कंपनी ई-स्कूटर्सपासून ई-बाईक आणि ई-कारर्यंत आपली ईव्ही रेंज विस्तारित करण्याचा विचार करत आहे. (Ola Electric to launch E-motorcycle and cheap E-Scooter in next year)

भाविश अग्रवाल यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एक ट्विट करून इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्वस्त ई-स्कूटर्सबाबत कंपनीच्या टाइमलाइनची पुष्टी केली आहे. इलेक्ट्रिक मोटारसायकल आणि स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या उत्पादनाबद्दल ओला इलेक्ट्रिकची एक बातमी रिट्विट करत अग्रवाल यांनी लिहिले आहे की, होय! पुढच्या वर्षी आम्ही आमची इलेक्ट्रिक वाहन रेंज वाढवणार आहोत.

सप्टेंबरच्या सुरुवातीला, ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक मोटारसायकल आणि कार विकसित करण्याच्या आपल्या योजनांना गती देण्यासाठी 20 कोटी डॉलर्स जमा केले होते. अग्रवाल यांनी ट्विट केले होते की, निधी उभारणी हा EV स्टार्टअपच्या ‘मिशन इलेक्ट्रिक : नो पेट्रोल 2W इन इंडिया 2025’ ही योजना फास्ट ट्रॅक करण्याचा एक भाग आहे. या दशकाच्या मध्यापर्यंत पेट्रोलवर चालणारी एकही दुचाकी देशातील रस्त्यावर धावणार नाही, असा कंपनीचा अंदाज आहे.

ईव्ही स्टार्टअपने या वर्षी ऑगस्टमध्ये आपली पहिली बॅटरीवर चालणारी स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro लाँच केली आणि सध्या हे मॉडेल दिल्ली, बंगळुरु, कोलकाता आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध आहे. या शहरांमध्ये ठिकठिकाणी टेस्ट राइड्सची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून अनेक लोक त्यांची स्कूटर रिझर्व्ह करु शकतील.

ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरमध्ये काय आहे खास?

ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.

एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Ola Electric to launch E-motorcycle and cheap E-Scooter in next year)

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.