टोयोटाची ‘ही’ कार सर्वात लक्झरी, अभिनेता रणबीर कपूर वापरतो, जाणून घ्या
टोयोटाची ही लक्झरी एमपीव्ही रणबीर कपूरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या गॅरेजमध्ये उभी आहे. या कारचे फीचर्स आणि डिझाइन पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. येथे आम्ही तुम्हाला या कारमध्ये मिळणारे खास फीचर्स, इंजिन, मायलेज आणि इतर डिटेल्स बद्दल सांगत आहोत. अॅपच्या (रिमोट) माध्यमातून तुम्ही या कारला कंट्रोल करू शकता.

टोयोटा वेलफायरची अनेकांना क्रेझ आहे. पण, ही फार महाग आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडे ही कार तुम्हाला दिसेल. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, व्हेइकल स्टेबिलिटी कंट्रोल हे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारचे फीचर्स आणि डिझाइन पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. येथे आम्ही तुम्हाला या कारमध्ये मिळणारे खास फीचर्स, इंजिन, मायलेज आणि इतर डिटेल्स बद्दल सांगत आहोत. या कारविषयी पुढे विस्ताराने जाणून घ्या.
सुपर लक्झरी टोयोटा वेलफायरची फीचर्स तुम्हाला आश्चर्यचकित करतील. टोयोटा किर्लोस्कर मोटर वेलफायर एमपीव्ही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालकीची आहे. ज्यात रणबीर कपूरचेही नाव येते. टोयोटा वेलफायरचे दोन प्रकार आहेत. सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक सिस्टमने सुसज्ज असलेल्या या कारची एक्स-शोरूम किंमत 11,990,000 रुपये आणि व्हीआयपी एक्झिक्युटिव्ह लाउंज व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 12,990,000 रुपये आहे.
टोयोटा वेलफायर फीचर्स




प्रीमियम एमपीव्ही टोयोटा वेलफायर अनेक वैशिष्ट्यांसह येते. हे पाहून तुम्हालाही ते विकत घ्यावेसे वाटू शकते. मनोरंजनासाठी यात 14 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. शार्प आणि पार्टी वाइबसाठी 15 स्पीकरची जेबीएल साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. यात ड्युअल पॅनेल सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग ऑप्शन, सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, व्हेइकल स्टेबिलिटी कंट्रोल हे फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन आणि मायलेज
टोयोटा वेलफायरच्या मजबूत हायब्रीड इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये 2.5 लीटर इनलाइन 4-सिलिंडर डीओएचसी इंजिन आहे जे 142 किलोवॅटचे जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि 240 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन इलेक्ट्रिक मोटर आणि हायब्रीड बॅटरीशी जोडलेले आहे. या कारमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंगचा आरामदायक अनुभव मिळतो. आता याचे मायलेज लक्षात घेता या लक्झरी कारचे मायलेज 19.28 किमी प्रति लीटर पर्यंत आहे.
प्रगत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ही कार सर्वोत्तम आहे. यामध्ये तुम्हाला 60 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्स मिळत आहेत. यात इमर्जन्सी फीचर्स, रिमोट कंट्रोल व्हेईकल स्टार्ट आहे. एअर कंडिशनर, विंडो कंट्रोल करता येईल. रिमोटच्या माध्यमातून तुम्ही एसी चालू आणि बंद करू शकता, खिडकी उघडू आणि बंद करू शकता.
वेलफायरमधील फीचर्स युजर फ्रेंडली आहेत. याचा इंटरफेस अगदी सोपा आहे. यात रिमोटली स्टार्ट इंजिन देण्यात आले आहे. अॅपच्या माध्यमातून कार कंट्रोल करता येणार आहे. ज्यामुळे युजर्ससाठी यात उपलब्ध असलेली सुविधा आणखी चांगली होते.
शार्प आणि पार्टी वाइबसाठी 15 स्पीकरची जेबीएल साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. ड्युअल पॅनेल सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग ऑप्शन, सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, व्हेइकल स्टेबिलिटी कंट्रोल हे फीचर्स देण्यात आले आहेत.