अवघ्या 5 महिन्यात Rapido ऑटोच्या 10 लाख राईड्स, ‘या’ शहरात सर्वाधिक मागणी

| Updated on: Feb 25, 2021 | 5:11 PM

रॅपिडोने (Rapido) लाँचिंगनंतर पाच महिन्यांतच 10 लाख ऑटो राईड पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. (Rapido Auto completes 1 million rides)

अवघ्या 5 महिन्यात Rapido ऑटोच्या 10 लाख राईड्स, या शहरात सर्वाधिक मागणी
Rapido
Follow us on

नवी दिल्ली : रॅपिडोने (Rapido) लाँचिंगनंतर पाच महिन्यांतच 10 लाख ऑटो राईड पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झालेली रॅपिडो ऑटो सर्व्हिस सध्या भारतातील 25 शहरांमध्ये सुरु आहे आणि जवळपास 70,000 कॅप्टन्स (ड्रायव्हर-पार्टनर) आहेत. पुढील सहा महिन्यांत आणखी 5 लाख राईड पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे. (Rapido Auto completes 1 million rides in five months: Highest demand in this city)

दरम्यान, रॅपिडोने महिलांना ऑटो कॅप्टनच्या ताफ्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्याची आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी देण्याची योजना आखली आहे. सर्व शहरांपैकी हैदराबाद, दिल्ली आणि चेन्नई येथे रॅपिडो ऑटोला सर्वाधिक मागणी आहे. प्रत्येक रॅपिडो ऑटो रॅपिडोच्या जीपीएस तंत्रज्ञानाने सूसज्ज आहे. रॅपिडो ऑटोद्वारे, युजर्स इतर लोकांसोबत त्यांच्या प्रवासाची माहिती ट्रॅक करु शकतात तसेच शेअरही करु शकतात.

सध्या मार्केटमध्ये अशा काही सुविधा दिल्या जात आहेत ज्यामुळे माणसाला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. आतापर्यंत घरातील वस्तू भाड्याने मिळत होत्या. पण आता बाईक्सही भाड्याने मिळणार आहेत. बाईक टॅक्सी सेवा कंपनी Rapido ने देशातल्या सहा मोठ्या शहरांमध्ये बाईक भाड्याने देण्याची सेवा सुरू केली आहे. बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि जयपूर इथं रॅपिडो भाडे सेवा (Rapido rental services ) सुरू करण्यात आल्या आहेत. तर काही दिवसांनी मुंबईमध्येही सेवा सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

या खास सुविधेमध्ये एक तास, दोन तास, तीन तास, चार तास आणि सहा तासांचं पॅकेज आहे. यामध्ये बाईकची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक ‘कॅप्टन’ म्हणजेच रॅपिडो ड्रायव्हर पार्टनर देखील मिळेल जो सतत तुमच्याबरोबर राहील आणि तुम्ही त्याला तिथे जायचं असेल तिथे तुम्हाला घेऊन जाईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा खासकरून अशा ग्राहकांसाठी आहे जे दिवसभर कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात.

मल्टी स्टॉप सिंगल बुकिंगची वाढली मागणी

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये ग्राहकाला वारंवार बुकिंगची करण्याची गरज नाही. दिवसातून एकदा बुक केलं तर कॅप्टन त्यांच्या सेवेसाठी तयार असणार आहे. रॅपिडोचे सहसंस्थापक अरविंद सानका या सेवेविषयी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत वारंवार मल्टी स्टॉप, परवडणारी आणि सहज उपलब्ध राईडची मागणी काळाबरोबर वाढत आहे. विशेषतः कोरोनाच्या संकटानंतर याला वेग आला आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा 100 शहरांमध्ये वाढवण्याची आमची योजना आहे. सध्या रॅपिडो देशातील 100 शहरांमध्ये टॅक्सी बाईक म्हणून उपलब्ध आहे.

इतर बातम्या

2021 Maruti Swift बाजारात दाखल, नव्या फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत…

शानदार ऑफर! 4 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 2.15 लाख रुपयांमध्ये खरेदी करा

नव्या बदलांसह TATA Tiago चं लिमिटेड एडिशन सादर, जाणून घ्या काय आहे खास

(Top 7 Changes In 2021 Maruti Suzuki Swift Facelift)

(Rapido Auto completes 1 million rides in five months: Highest demand in this city)