AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बाईक आणि सोबत ड्रायव्हरही मिळणार भाड्याने, कमी पैशात हव्या तितक्या ठिकाणी फिरा

आतापर्यंत घरातील वस्तू भाड्याने मिळत होत्या. पण आता बाईक्सही भाड्याने मिळणार आहेत. बाईक टॅक्सी सेवा कंपनी Rapido ने देशातल्या सहा मोठ्या शहरांमध्ये बाईक भाड्याने देण्याची सेवा सुरू केली आहे.

आता बाईक आणि सोबत ड्रायव्हरही मिळणार भाड्याने, कमी पैशात हव्या तितक्या ठिकाणी फिरा
| Edited By: | Updated on: Feb 22, 2021 | 3:22 PM
Share

मुंबई : सध्या मार्केटमध्ये अशा काही सुविधा दिल्या जात आहेत ज्यामुळे माणसाला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. आतापर्यंत घरातील वस्तू भाड्याने मिळत होत्या. पण आता बाईक्सही भाड्याने मिळणार आहेत. बाईक टॅक्सी सेवा कंपनी Rapido ने देशातल्या सहा मोठ्या शहरांमध्ये बाईक भाड्याने देण्याची सेवा सुरू केली आहे. बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि जयपूर इथं रॅपिडो भाडे सेवा (Rapido rental services ) सुरू करण्यात आल्या आहेत. तर काही दिवसांनी मुंबईमध्येही सेवा सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (bike on rent rapido rental services launched in delhi chennai kolkata and bengaluru)

या खास सुविधेमध्ये एक तास, दोन तास, तीन तास, चार तास आणि सहा तासांचं पॅकेज आहे. यामध्ये बाईकची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक ‘कॅप्टन’ म्हणजेच रॅपिडो ड्रायव्हर पार्टनर देखील मिळेल जो सतत तुमच्याबरोबर राहील आणि तुम्ही त्याला तिथे जायचं असेल तिथे घेऊन जाईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा खासकरून अशा ग्राहकांसाठी आहे जे दिवसभर कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात.

मल्टी स्टॉप सिंगल बुकिंगची वाढली मागणी

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये ग्राहकाला वारंवार बुकिंगची करण्याची गरज नाही. दिवसातून एकदा बुक केलं तर कॅप्टन त्यांच्या सेवेसाठी तयार असणार आहे. रॅपिडोचे सहसंस्थापक अरविंद सानका या सेवेविषयी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत वारंवार मल्टी स्टॉप, परवडणारी आणि सहज उपलब्ध राईडची मागणी काळाबरोबर वाढत आहे. विशेषतः कोरोनाच्या संकटानंतर याला वेग आला आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा 100 शहरांमध्ये वाढवण्याची आमची योजना आहे. सध्या रॅपिडो देशातील 100 शहरांमध्ये टॅक्सी बाईक म्हणून उपलब्ध आहे. (bike on rent rapido rental services launched in delhi chennai kolkata and bengaluru)

संबंधित बातम्या – 

कमी पैशात करा ‘हा’ कोर्स आणि स्वस्त: बनवा इलेक्ट्रिक कार, DIY ची बेस्ट बिझनेस आयडिया

प्रतीक्षा संपली, नवी 7 सीटर Tata Safari 2021 लाँच, किंमत…

केवळ 51000 रुपयात घरी न्या 83KM मायलेज देणारी मोटारसायकल

(bike on rent rapido rental services launched in delhi chennai kolkata and bengaluru)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.