नव्या बदलांसह TATA Tiago चं लिमिटेड एडिशन सादर, जाणून घ्या काय आहे खास

टाटा मोटर्सने टियागो लिमिटेड एडिशन (Tiago Limited Edition) कार गेल्या महिन्यात 5.79 लाख रुपये या प्राईस टॅगसह सादर केली होती.

नव्या बदलांसह TATA Tiago चं लिमिटेड एडिशन सादर, जाणून घ्या काय आहे खास

मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) टियागो लिमिटेड एडिशन (Tiago Limited Edition) कार गेल्या महिन्यात 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या प्राईस टॅगसह सादर केली होती. ही हॅचबॅक कार आता टाटाच्या डीलरशिप्सकडे दिसू लागली आहे. हे लिमिटेड एडिशन मॉडल डेटोना ग्रे रंगात पाहायला मिळू शकतं. याशिवाय गाडी दोन रंगांमध्ये सादर केली जाऊ शकते. ज्यामध्ये फ्लेम रेड आणि पर्लसेंट व्हाईट या रंगांचा समावेश आहे. लिमिटेड एडिशन टियॅगोमध्ये 14 इंचांचे एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. (Tata Tiago limited edition arrives at company dealerships)

रेग्युलर ट्रिमशिवाय Tiago लिमिटेड एडिशनमध्ये रियर पार्सल ट्रे आणि वॉईस कमांड सिस्टिमसह पाच इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. अडंर द हुड गाडीत 1.2 लीटरचं रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. याची मोटर 5 स्पीड मॅनुअल युनिटद्वारे जबरदस्त पॉवर देते.

काय आहे खास

टाटा टियागो 2016 मध्ये लाँच करण्यात आलेली कार आहे. लाँचिंगपासूनही टाटाच्या लाईनअपमध्ये ही एक मजबूत आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. कंपनीने 2020 मध्ये त्यांच्या गुजरातमधील साणंद प्लांटमधून टियागोचे 3,00,000 युनिट्स रोलआउट केले होते. ही टाटाची IMPACT डिझाईन फिलॉसफीअंतर्गत बनलेली पहिली कार होती. टियागोला ग्लोबल NCap सुरक्षा टेस्टमध्ये चार स्टार रेटिंग मिळलं आहे. या कारच्या काही वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कार एयर बॅग, रियर पार्किंग असिस्ट आणि ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशनसह सादर करण्यात आली आहे.

नवीन टियागो लिमिटेड एडिशनच्या लाँचिंगबाबत बोलताना टाटा मोटर्सचे मार्केटिंग हेड, विवेक श्रीवत्स म्हणाले की, “2016 मध्ये लाँच झाल्यानंतर टियागो ही कार तिच्या सेगमेंटमध्ये एक यशस्वी कार ठरली आहे. तसेच ही कार सातत्याने लोकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. आम्हाला विश्वास आहे की, टियागोच्या लिमिटेड एडिशन वेरिएंटची सुरुवात आणि आमच्या न्यू फॉरएव्हर फिलॉसफीसह आम्ही सातत्याने ग्राहकांच्या पसंतीत उतरतील असे मॉडल्स लाँच करत राहू.”

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Renault Kiger चं कोणतं वेरिएंट तुमच्या खिशाला परवडेल? जाणून घ्या सर्व किंमती

(Tata Tiago limited edition arrives at company dealerships)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI