AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 Maruti Swift बाजारात दाखल, नव्या फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत…

भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कारला आता फेसलिफ्ट लुक देण्यात आला आहे. (2021 Maruti Suzuki Swift Facelift)

2021 Maruti Swift बाजारात दाखल, नव्या फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत...
2021 Maruti Swift
| Updated on: Feb 24, 2021 | 12:53 PM
Share

मुंबई : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक कार 2021 Maruti Swift चं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये नवीन फ्रंट फॅसिआसह (front fascia) सदर करण्यात आली आहे. कारमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे. मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट फेसलिफ्टसह क्रूझ कंट्रोल देखील सादर केला आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,73,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे. (2021 Maruti Swift launch in india, know price and feature details)

Maruti Suzuki Swift या हॅचबॅक कारला आता फेसलिफ्ट लुक देण्यात आला आहे. मारुती सुझुकी स्विफ्टचा (Maruti Suzuki Swift) मिडलाईफ मेकओव्हर करण्यात आला आहे. या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल. फेसलिफ्टेड स्विफ्टने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर जपान आणि युरोपसारख्या निवडक बाजारात या कारची विक्री सुरु झाली आहे. आता भारतातही या कारची विक्री सुरु करण्यात आली आहे.

स्विफ्टचे थर्ड जनरेशन मॉडेल 2017 पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारचे नवीन मॉडेल लवकरच नव्या अपडेट्ससह सादर केलं आहे. फेसलिफ्ट स्विफ्ट लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने या कारचा पहिला अधिकृत टीझर जारी केला होता. या कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास स्विफ्ट 2021 मध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही आणि ही कार आंतरराष्ट्रीय व्हेरिएंटप्रमाणेच आहे.

काय बदललं?

कारच्या पुढच्या बाजूला हेडलॅम्प्सच्या आकारात थोडा बदल करण्यात आला, तर क्रोम आणि ग्रीलदेखील पूर्णपणे बदललं आहे. बम्परमध्ये थोडा बदल झाला आहे, जेणेकरून फॉग लँप किंचित बाहेरच्या बाजूला दिसेल. टीझर व्हिडिओसह मारुती सुझुकीने म्हटलं आहे की, लिमिटलेस थ्रिल, स्टनिंग लुक्ससह नवी स्विफ्ट सादर होतेय.

इंटीरियरमध्ये बदल

आतील भागात (इंटीरियरमध्ये) फारसा बदल दिसणार नाही, सर्व काही जुन्या कारप्रमाणेच आहे. परंतु पूर्ण ब्लॅक थीममध्ये सिल्व्हर इंटस्र्ट्ससह काँट्रास्ट दिला आहे. यामध्ये तुम्हाला 7.0 इंचांची स्मार्टप्ले स्टूडियो इंफोटेन्मेंट सिस्टिम मिळेल जी अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह येते. तसेच या गाडीत सेमी डिजिटिल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिलं जाऊ शकतं, जे 4.2 इंचांच्या कलर MID, क्लायमेट कंट्रोल, पुश बटन, हिल होल्ड कंट्रोल आणि ESC सह येतं.

दमदार इंजिन

आयडॉल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट नेक्स्ट जनरेशन के-सीरिज 1.2 लीटर ड्युअल जेट डुअल VVT इंजिन सादर करण्यात आले आहे. ड्युअल जेट टेक्नॉलॉजी (प्रति सिलिंडर 2 इंजेक्टर), ड्युअल व्हीव्हीटी (इनटेक आणि एक्झॉस्ट व्हॉल्व दोन्हीसाठी व्हेरिएबल व्हॉल्व टायमिंग) आणि ईजीआर सिस्टममुळे या कारचा परफॉर्मन्स दमदार राहील, असा कंपनीचा दावा आहे.

मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये त्याची इंधन कार्यक्षमता 23.20 किमी / लीटर एमटी आणि स्वयंचलित गीअर सिस्टममध्ये (ऑटोमेटिक गियर सिस्टम) याची इंधन कार्यक्षमता 23.76 किमी / लीटर इतकी आहे. या वाहनात क्रूझ कंट्रोल, कलर्ड मल्टी इन्फोर्मेशन डिस्प्ले आणि की यासह काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांसाठी Sync ऑटो फोल्डेबल ORVM देण्यात आले आहेत. त्याच्या AGS व्हेरिएंटमध्ये हिल असिस्ट इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रामचा समावेश करण्यात आला आहे.

सेफ्टी फीचर्स

या कारच्या सेफ्टी फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास नवीन स्विफ्टला ESP (इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम), हिल होल्ड ऑटोमॅटिक गियर सिस्टिम, दोन सेफ्टी एअरबॅग आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Electronic Stability Program)

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

सिंगल चार्जवर 480KM धावणार, Hyundai Ioniq 5 क्रॉसओव्हर बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

कार घेण्याचा विचार करताय? 4 लाखांपेक्षा कमी किमतीत हे जबरदस्त पर्याय

(2021 Maruti Swift launch in india, know price and feature details)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.