भारतातली सर्वात महागडी कार मुकेश अंबानींच्या ताफ्यात, किंमत ऐकून थक्क व्हाल! केवळ VIP नंबरसाठी 12 लाख

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे त्यांच्या लक्झरी कार कलेक्शनसाठी ओळखले जातात. त्यांनी आता आणखी एका नवीन आलिशान कारचा (Luxury Car) आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.

भारतातली सर्वात महागडी कार मुकेश अंबानींच्या ताफ्यात, किंमत ऐकून थक्क व्हाल! केवळ VIP नंबरसाठी 12 लाख
Rolls Royce Cullinan Suv (फोटो क्रेडिट- rolls-roycemotorcars)
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:16 PM

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे त्यांच्या लक्झरी कार कलेक्शनसाठी ओळखले जातात. त्यांनी आता आणखी एका नवीन आलिशान कारचा (Luxury Car) आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. या कारची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industry) मालकाने 13.14 कोटी रुपयांची अल्ट्रा-लक्झरी रोल्स रॉयस कलिनन एसयूव्ही (Rolls Royce Cullinan SUV) खरेदी केली आहे. आरटीओ अधिकार्‍यांच्या मते, ही देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात 31 जानेवारी रोजी या गाडीची नोंदणी करण्यात आली होती. ही कार 2018 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि तेव्हा या कारची किंमत 6.95 कोटी रुपये इतकी होती. पण कस्टमाइज्ड मॉडिफिकेशनमुळे कारच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे ऑटो उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

RIL ने 20 लाख रुपये कर जमा केला

RTO अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीने 2.5 टन पेक्षा जास्त वजनाच्या आणि 564 bhp पॉवर जनरेट करणाऱ्या 12 सिलेंडर कारसाठी ‘टस्कन सन’ रंगाचा पर्याय निवडला आहे. गाडीसाठी खास नंबर प्लेट तयार करण्यात आली आहे. अंबानींच्या या नवीन कारची नोंदणी 30 जानेवारी 2037 पर्यंत वैध आहे. यासोबतच RIL ने वन टाइम टॅक्स म्हणून 20 लाख रुपये जमा केले आहेत. तसेच रस्ता सुरक्षेसाठी 40,000 रुपयांचे वेगळे पेमेंटही करण्यात आले आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही भारतात खरेदी केलेली सर्वात महागडी कार देखील असू शकते. RIL ने आपल्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरच्या नवीन कारला VIP नंबर मिळवण्यासाठी 12 लाख रुपये दिले आहेत. अंबानी यांनी या कारसाठी ‘0001’ हा नंबर मिळवला आहे. साधारणपणे एका व्हीआयपी क्रमांकाची किंमत 4 लाख रुपये असते, परंतु सध्याच्या सिरीजमधील क्रमांक आधीच घेतला होता, त्यामुळे नवीन सिरीज सुरू करण्यात आली आहे.

Rolls Royce Cullinan ची खासियत

Rolls Royce Cullinan भारतात 2018 मध्ये हॅचबॅक कार म्हणून लॉन्च करण्यात आली होती. अंबानींच्या गॅरेजमधील हे तिसरे Cullinan मॉडेल असेल. इतर काही उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हे मॉडेल वापरतात. ब्रिटीश निर्मात्यांच्या वेबसाइटनुसार, Cullinan ही Rolls-Royce ची पहिली ऑल-टेरेन SUV आहे. RIL च्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या आलिशान गाड्या आहेत.

रोल्स रॉयस कलिनन हे नाव आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या हिऱ्याच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. आलिशान SUV मध्ये 6.75 लीटर ट्विन-टर्बो V12 रोल्स-रॉयस इंजिन आहे जे ऑल-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील स्टीयर सिस्टमसह 563bhp आणि 850Nm टॉर्क जनरेट करते.

इतर बातम्या

तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय ‘गाडी बुला रही है…’; किंमत फक्त…

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.