AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 ते 20 हजार देऊन आजच करा Renault Kiger ऑफिशिअल बुकिंग, धमाकेदार आहेत फीचर्स

या कारची विक्री मार्च 2021 पासून सुरू होणार आहे. पण अद्याप कार खरेदी करण्यावरून ग्राहकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला यासबंधी काही महत्त्वाची माहिती देणार आहोत.

10 ते 20 हजार देऊन आजच करा Renault Kiger ऑफिशिअल बुकिंग, धमाकेदार आहेत फीचर्स
| Edited By: | Updated on: Feb 02, 2021 | 10:29 AM
Share

मुंबई : रेनॉल्ट Kiger ला कंपनीने गेल्या काही दिवसांआधीच जगासमोर सादर केलं होतं. या कारची विक्री मार्च 2021 पासून सुरू होणार आहे. पण अद्याप कार खरेदी करण्यावरून ग्राहकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला यासबंधी काही महत्त्वाची माहिती देणार आहोत. जिथे ग्राहक डीलरशिपवर कारची अधिकृत बुकिंग देखील करू शकतात. अनधिकृत बुकिंगसाठी तुम्हाला डिलरशिपवर जाऊन सुरुवातील 10,000 ते 20,000 रुपये द्यावे लागतील. (renault kiger unofficial bookings have begun automobile news )

कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारी जागतिक उत्पादन असणार आहे. नवीन रेनॉल्ट एसयूव्हीच्या किंमती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सोनेट, ह्युंदाई वेन्यू, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सन, महिंद्रा केयूव्ही 300 आणि इतर कार्ससाठी ही एक मोठी टक्कर असणार आहे. पण या कारची किंमत 5 लाख रुपयांपासून सुरू होईल असा अंदाज लावण्यात येत आहे.

Renault Kiger चं कसं आहे डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे.

Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त एसयूव्ही?

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची Renault कंपनीसुद्धा किगर (Kiger) नावाची नवी कार बाजारात आणली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.50 लाख आहे. याआधी Nissan Magnite या कंपनीची एसयूव्ही असणारी कार नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2021 पासून या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault तयार करत असलेली Kiger या कारची किंमत सर्वात कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. (renault kiger unofficial bookings have begun automobile news )

संबंधित बातम्या – 

स्क्रॅपेज पोलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्ष जुन्या कार भंगारात जाणार? जाणून घ्या तुमच्याकडील पर्याय

Car Sales : Maruti आणि Tata सह ‘या’ कंपन्यांच्या वाहनविक्रीत वाढ

Vehicles scrapping Budget 2021: जुन्या वाहनांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, 5 वर्ष जास्त काळ चालवू शकाल गाडी

(renault kiger unofficial bookings have begun automobile news )

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.