‘या’ इलेक्ट्रिक बाईकच्या किंमतीत 28000 रुपयांची कपात, सिंगल चार्जवर 150 किमी रेंज

भारतात सध्या इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वेगाने वाढत आहे. त्यातही प्रामुख्याने रिव्होल्ट मोटर्सची (Revolt Motors) इलेक्ट्रिक बाईक आरव्ही 400 (RV400) ची लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे.

'या' इलेक्ट्रिक बाईकच्या किंमतीत 28000 रुपयांची कपात, सिंगल चार्जवर 150 किमी रेंज
Revolt Rv400

मुंबई : भारतात सध्या इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वेगाने वाढत आहे. त्यातही प्रामुख्याने रिव्होल्ट मोटर्सची (Revolt Motors) इलेक्ट्रिक बाईक आरव्ही 400 (RV400) ची लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्रत्येक वेळी या बाईकचे बुकिंग सुरु केल्यानंतर अवघ्या काही तासांतच बुकिंग बंद होते. गेल्या महिन्याच्या शेवटी या बाईकचे बुकिंग पुन्हा सुरू झाले आणि अवघ्या दोनच तासांत कंपनीने बुकिंग घेणे थांबविले. कंपनीने म्हटले की, त्यांनी 50 कोटी रुपयांच्या बाइक्स बुक केल्या आहेत. (Revolt RV400 price reduced by Rs 28000, buy electric bike in cheaper rate)

कंपनीने म्हटले आहे की, रिव्होल्ट आरव्ही 400 (Revolt RV400) इलेक्ट्रिक बाईकसाठी अधिक बुकिंग्स प्राप्त झाल्या आहेत, कारण सरकारच्या फेम II (FAME II) अनुदानानंतर या बाईकच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. फेम II अनुदानामध्ये सुधारणा केल्यानंतर दिल्लीतील ग्राहकांना ही बाईक एक लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. यासह कंपनीने असेही म्हटले आहे की, त्यांनी भारतातील 35 शहरांमध्ये आपली वितरक सेवा वाढवण्यास सुरुवात केले आहे.

Revolt Motors ने म्हटले आहे की, भारतातील अनेक शहरांमध्ये या इलेक्ट्रिक बाईकला मोठी मागणी आहे. कंपनीने म्हटले आहे की, दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबादसह 6 शहरांमध्ये या बाईकला चांगली पसंती मिळत आहे आणि लोक ही बाईक बुक करण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.

Revolt RV400 बाईकवर 28,200 रुपयांचा लाभ

FAME II सबसिडीनंतर या बाईकच्या किंमतीत 12 हजार रुपये कपात करण्यात आली आहे, त्यानंतर या बाईकची किंमत 1,06,999 रुपयांवर गेली आहे. जर आपण दिल्लीबद्दल बोललो, तर ही बाईक अधिक डिस्काऊंटसह विकत घेता येईल. यात दिल्ली सरकारच्या ईव्ही पॉलिसीने दिलेली सूटदेखील समाविष्ट करता येईल, ज्यामध्ये तुम्हाला 16,200 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. याचा अर्थ असा की, दिल्ली सरकारने दिलेल्या फायद्यांचा आणि FAME II च्या अनुदानाचा फायदा घेत केवळ 90,799 रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) ही बाईक खरेदी करता येईल. केंद्राची FAME II सबसिडी आणि दिल्ली सरकारचं अनुदान मिळून या बाईकवर 28,200 रुपयांची सूट मिळू शकते.

सिंगल चार्जवर 150 किलोमीटर धावणार

Revolt RV 400 इलेक्ट्रिक बाइकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास ही बाईक सिंगल चार्जमध्ये 150 किमीची रेंज देते. या बाईकचं टॉप स्पीड ताशी 85 किमी इतकं आहे. कंपनीने यात 3.24 किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली असून या बॅटरीसह कंपनीकडून 1,50,000 किलोमीटरची वॉरंटी देण्यात आली आहे. यामध्ये आपणास Eco, Normal आणि Sports असे तीन रायडिंग मोड्स मिळतील. या बाईकमधील लिथियम आयन बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एकूण साडेचार तास लागतात.

ही बाईक डेडिकेटेड MyRevolt मोबाइल अ‍ॅपसह सादर करण्यात आली आहे, जी जिओफेन्सींग, ट्रिप डिटेल्स, क्लोज चार्जिंग स्टेशनची माहिती आणि पसंतीचे एक्झॉस्ट साऊंडसारखे फीचर्स ऑफर करते. त्याचप्रमाणे, आरव्ही 300 मध्ये 1500W रेटिंग वाली मोटार देण्यात आली आहे, जी जास्तीत जास्त ताशी 65 किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते आणि त्यामध्ये 2.7kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

इतर बातम्या

Dhoom सिनेमात जॉनने वापरलेली Hayabusa बाईक भारतात परतणार, स्पीडचा रेकॉर्ड किती?

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(Revolt RV400 price reduced by Rs 28000, buy electric bike in cheaper rate)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI