Royal Enfield च्या चाहत्यांना धक्का, Bullet 350 सह लोकप्रिय बाईक्स महागल्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Jul 10, 2021 | 3:55 PM

रॉयल एनफील्डच्या (Royal Enfield) चाहत्यांना बाईक खरेदी करण्यासाठी खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे.

Royal Enfield च्या चाहत्यांना धक्का, Bullet 350 सह लोकप्रिय बाईक्स महागल्या
Royal Enfield Meteor 350

मुंबई : रॉयल एनफील्डच्या (Royal Enfield) चाहत्यांना बाईक खरेदी करण्यासाठी खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. कारण कंपनीने आपल्या बाईकच्या किंमती वाढविल्या आहेत. वाढीव किंमती 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आल्या आहेत. कोणत्याही मेकॅनिकल अपग्रेड किंवा कॉस्मेटिक बदलांशिवाय कंपनीने आपली दमदार बाइक Meteor 350 ची किंमत वाढवली आहे. यासह कंपनीने Royal Enfield Bullet 350, क्लासिक 350, हिमालयन, कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि इंटरसेप्टर 650 च्या किंमतीही वाढवल्या आहेत. कंपनीने या बाईकच्या किंमतीत 10,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. (Royal Enfield Bullet 350, Meteor 350, Himalayan, interceptor price hiked up to 10000, check new price)

कंपनी Royal Enfield Meteor 350 बाइक तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात फायरबॉल, स्टेलर आणि सुपरनोव्हाचा समावेश आहे. फायरबॉल व्हेरिएंटची किंमत 9,441 रुपयांनी वाढविण्यात आली असून आता या बाईकची किंमत 1,92,109 रुपयांवर गेली आहे. त्याच वेळी, स्टेलर व्हेरिएंटची किंमत 9,665 रुपयांनी वाढविण्यात आली आहे, त्यामुळे या बाईकची किंमत 1,98,099 रुपयांवर गेली आहे. याशिवाय सुपरनोव्हा व्हेरियंटच्या किंमतीमध्ये 10,048 रुपये वाढविण्यात आले असून या बाईकची किंमत 2,08,084 रुपयांवर गेली आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम, बंगळुरुमधील आहेत.

Bullet 350 च्या किंमतीत वाढ

Bullet 350 बद्दल बोलायचे झाल्यास, या बाईकच्या सिल्वर ब्लॅक आणि ओनिक्स ब्लॅकच्या किंमतीत 4,767 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या बाईकची किंमत 1,58,485 वर गेली आहे, जी आधी 1,53,718 रुपये इतकी होती. त्याच वेळी ब्लॅक बुलेटची किंमत 4,979 रुपयांनी वाढविण्यात आली आहे आणि या बाईकची किंमत आता 1,60,775 रुपयांवरून 1,65,754 रुपयांवर गेली आहे. याशिवाय Bullet ES 350 रेंजची किंमत 5,459 रुपयांनी वाढविण्यात आली आहे आणि आता या बाईकची किंमत आधीच्या 1,76,731 रुपयांवरून 1,82,190 रुपयांवर गेली आहे.

कशी आहे Royal Enfield Meteor 350?

Meteor 350 मध्ये नवीन डिव्हाइस कन्सोल सेट-अप आणि स्प्लिट सीट डिजाइन देण्यात आली आहे. हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल करण्यात आले आहेत. डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये टियर-ड्रॉप शेप्ड इंधन टॅन्क, ब्राईट कलर ऑप्शन, एलईडी लाईट आणि एका स्प्लिट-सीटचा समावेश करण्यात आला आहे.

इंजिन

नव्या मीटिओर 350 मध्ये एक नवीन फ्रेम आणि नवीन इंजिन देण्यात आलं आहे. मीटिओर 350 मध्ये डबल-क्रॅडल चेसिसचा वापर करण्यात आला आहे. असं सांगितलं जातंय की, नवीन 350 सीसी इंजिन पूर्वीपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. या बाईकचं इंजिन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क निर्माण करु शकतं.

इतर फिचर्स

मीटिओरला एक मीडियम टीएफटी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत मेन यूनिट जे ट्रिप मीटर आणि इतर डिटेल्ससाठी अॅनालॉग स्पीडोमीटर एलईडी पॅनलसह आहे. Meteor 350 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि नवीन टीएफटी डिस्प्लेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सुविधा आहे.

इतर बातम्या

मेड इन इंडिया OLA स्कूटर प्लांटमध्ये लवकरच उत्पादन सुरु, दरवर्षी 20 लाख गाड्या तयार होणार

मध्यमवर्गीय ग्राहकांना झटका, होंडाची ‘ही’ बाईक वर्षभरात तिसऱ्यांदा महागली

वाहन उद्योग रुळावर, जून महिन्यात 2.38 लाख दुचाकींसह TVS Motors ची विक्रमी विक्री

(Royal Enfield Bullet 350, Meteor 350, Himalayan, interceptor price hiked up to 10000, check new price)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI