खास बदलांसह Royal Enfield Interceptor 650 लाँच होणार, बुकिंग सुरु

रॉयल एनफील्ड कंपनी लवकरच इंटरसेप्टर 650 (Royal Enfield Interceptor 650) ही बाईक लाँच करु शकते, कंपनीने त्यासाठी तयारी सुरु केली आहे.

खास बदलांसह Royal Enfield Interceptor 650 लाँच होणार, बुकिंग सुरु
Royal Enfield Interceptor 650 Booking starts, RE made special changes in Bike

मुंबई : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) सध्या बर्‍याच बाईकवर काम करत आहे. यादीमध्ये ज्या वाहनला सर्वाधिक महत्त्व दिले जात आहे त्या बाईकचं नाव आहे नवीन इंटरसेप्टर 650 (Royal Enfield Interceptor 650). अशी अपेक्षा आहे की ही शानदार बाईक लवकरच भारतात लॉन्च केली जाईल. कंपनीने या मोटारसायकलसाठी बुकिंगदेखील सुरू केले आहे. ही बाईक तुम्हाला आवडली तर तुम्ही रॉयल एनफिल्डच्या वेबसाइटवरुन ही बाईक बुक करु शकता. (Royal Enfield Interceptor 650 Booking starts, RE made special changes in Bike)

इंटरसेप्टर 650 मध्ये दोन नवीन सिंगल-टोन पेंट ऑप्शन्स मिळाले आहेत – कॅनन रेड आणि वेंचुरा ब्लू आणि दोन नवीन ड्युअल टोन पेंट ऑप्शन्स – डाउनटाउन ड्रॅग आणि सनसेट स्ट्रिप मिळतील. ऑरेंज क्रश आणि बेकर एक्सप्रेस रंग पर्याय याआधीच्या मॉडेलमध्ये देण्यात आले होते. ग्लिटर अँड डस्ट (क्रोम) पर्याय म्हणून ते थोडे अपडेट केले आहेत आणि Gl मार्क टूमध्ये पुन्हा नॉमिनेट केले. 2021 इंटरसेप्टर 650 मध्ये मार्क थ्री, रॅविशिंग रेड, सिल्व्हर स्पेक्टर कलर स्कीम बंद केली आहे.

इंटरसेप्टर 650 मध्ये आता सिंगल-टोन कलर ऑप्शनमध्ये ब्लॅक-आउट रिम आणि मडगार्ड्स मिळतात, जे पूर्वी ऑरेंज क्रशसह ड्युअल टोन कलर्सपर्यंत मर्यादित होते. आरई 650 अ‍ॅलोय व्हील आणि ट्रिपर नेव्हिगेशनची ऑफर देत नाही, तथापि, कंपनी लवकरच ही बाईक अधिकृतपणे लाँच करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

इंजिन बदललं जाणार नाही

इंटरसेप्टर 650 च्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 648cc, एअर / ऑईल-कूल्ड, पॅरेलल-ट्वीन मोटर देण्यात आली आहे, जी 47.65 पीएस पॉवर आणि 52 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ट्रांसमिशन ड्यूटी 6-स्पीड सीक्वेंशियल गिअरबॉक्सद्वारे कंट्रोल होते. यासह, स्लिपर क्लच स्टँडर्ड स्वरूपात सादर केली गेली आहे.

इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार

रॉयल एनफील्ड कंपनी लवकरच भारतीय बाजारात इतर मोटारसायकलींची सिरीज सादर करण्याची योजना आखत आहे. यात नेक्स्ट जनरेशन क्लासिक 350 आणि नवीन 650cc क्रूझरचा समावेश आहे, या दोन्ही बाईक यंदा लॉन्च होणे अपेक्षित आहे. याशिवाय क्लासिक 650 बनवण्याचीही कंपनीची योजना आहे. यापूर्वी मोटारसायकल उत्पादक कंपनीने असे सांगितले होते की नजीकच्या काळात ते इलेक्ट्रिक मोटरसायकल देखील विकसित करतील.

इतर बातम्या

Ducati, Suzuki, Yamaha ला टक्कर, नवी Ninja ZX-10R बाजारात, जाणून घ्या किमंत आणि फीचर्स

‘या’ आहेत देशातील टॉप 10 बाईक्स, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

Royal Enfield Himalayan ची चायनीज कॉपी बाजारात, Hanway G30 मध्ये काय आहे खास?

(Royal Enfield Interceptor 650 Booking starts, RE made special changes in Bike)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI