‘या’ आहेत देशातील टॉप 10 बाईक्स, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टू-व्हीलर्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. (Top-Sellin gbikes In India In February 2021)

‘या’ आहेत देशातील टॉप 10 बाईक्स, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर
Bikes Sales 2201
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 3:29 PM

मुंबई : फेब्रुवारी 2021 हा महिना भारतीय दुचाकी उद्योगासाठी चांगला ठरला आहे, कारण गेल्या महिन्यात बहुतेक बाईक उत्पादकांनी विक्रीच्या बाबतीत सकारात्मक वाढ नोंदविली. हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडरने उद्योगातील वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले कारण गेल्या महिन्यात कंपनीने 2,47,422 युनिट्सची विक्री केली होती, जी मागील वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या युनिटपेक्षा 14% जास्त आहे. हिरोने फेब्रुवारी 2020 मध्ये 2,15,196 वाहनांची विक्री केली होती. (Top 10 most selling bikes in India in February – Hero Splendor Continues To Remain Top-Ranked)

Hero HF Deluxe दुसऱ्या तर Shine तिसऱ्या स्थानी

या यादीत दुसर्‍या क्रमांकावर हिरो कंपनीची एचएफ डिलक्स ही बाईक आहे. कंपनीने गेल्या महिन्यात बाईकच्या 1,26,309 युनिट्सची विक्री केली आहे. फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत एचएफ डिलक्सच्या विक्रीत सुमारे 28% घट झाली आहे. यादीतील तिसरे स्थान होंडा सीबी शाइन मोटरसायकलने पटकावले आहे. ही बाईक प्रीमियम कम्यूटर सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या महिन्यात सीबी शाईनच्या 1,15,970 युनिट्सची विक्री करण्यात कंपनीला यश आले. कंपनीने फेब्रुवारी 2020 मध्ये सीबी शाईनच्या 50,825 युनिट्सची विक्री केली होती.

Bajaj च्या Pulsar आणि Platina चा चौथ-पाचवा क्रमांक

चौथ्या क्रमांकावर बजाज पल्सर ही बाईक असून गेल्या महिन्यात कंपनीने पल्सरची 81,454 वाहने विकली आहेत. वर्षभरापूर्वी याच महिन्यात कंपनीने पल्सर बाईकच्या 75,669 वाहनांची विक्री केली होती. पुणे स्थित मोटारसायकल उत्पादक कंपनीच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. पल्सरनंतर प्लॅटिनाचा नंबर लागतो. ही एक एंट्री-लेव्हल कम्यूटर बाईक आहे. कंपनीने गेल्या महिन्यात प्लॅटिनाच्या 46,264 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने प्लॅटिनाच्या 33,799 युनिट्सची विक्री केली होती.

Royal Enfield आणि TVS च्या गाड्या टॉप 10 मध्ये

सहाव्या क्रमांकावर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही बाईक आहे. कंपनीने या बाईकच्या 36,025 युनिट्सची विक्री केली आहे. रॉयल एनफिल्डनंतर हिरो पॅशन या बाईकचा नंबर लागतो. कंपनीने या बाईकच्या 34,417 युनिट्सची विक्री केली आहे. तर पॅशननंतर टीव्हीएस अपाचे या बाईकचा नंबर लागतो. कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये अपाचे या बाईकच्या 31,735 युनिट्सची विक्री केली आहे. या यादीत नववं आणि दहावं स्थान हिरो ग्लॅमर आणि होंडा युनिकॉर्न या मोटारसायकलींनी पटकावलं आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कंपन्यांनी या मोटारसायकलींच्या अनुक्रमे 27,375 आणि 22,281 युनिट्सची विक्री केली आहे.

संबंधित बातम्या

‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.