
भारतीय बाजारपेठेत रेट्रो लुक डिझाइन केलेल्या बाईकची क्रेझ सर्वाधिक पाहायला मिळते, त्यात जर रॉयल एन्फिल्डच्या आणि होंडाच्या बाईक्स असतील तर त्याची बातच काही और असते. रेट्रो बाईक्स म्हटलं की तरुणांचे विशेष प्रेम पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला तीन लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणत्या बाईक्स मिळू शकतात याबद्दल माहिती देणार आहोत. 3 लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये होंडा, रॉयल एनफिल्ड, तसेच जावा आणि हार्ले डेव्हिडसन सारख्या कंपन्या दमदार इंजिन असलेल्या रेट्रो लुक बाइकची विक्री करत आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.
होंडा कंपनीची ही बाईक 348.36 सीसी सिंगल सिलिंडर इंजिनने सुसज्ज आहे जी 20.78bhp पॉवर आणि 30 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक ग्राहकांना केवळ BigWing Honda डीलर्स कडून खरेदी करता येणार आहे. या बाईकची किंमत 2 लाख 09 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
BSA Goldstar ही बाईक 652 सीसी सिंगल सिलिंडर इंजिनने सुसज्ज आहे जी 45.6bhp पॉवर आणि 55 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकची किंमत (एक्स-शोरूम) 2 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.
रेट्रो लुक बाइक्सच्या या लिस्टमधील सर्वात स्वस्त बाईक जावा कंपनीची आहे. या बाईकची किंमत 1 लाख 72 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते आणि ही बाईक 294.72 सीसी सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन असलेली ही बाईक तुम्हाला 26.94bhp पॉवर आणि 26.84 एनएम टॉर्क जनरेट करते.
रॉयल एनफिल्डच्या या बाईकने भारतात रेट्रो सेगमेंट लूक परत आणला असून ग्राहकांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे. या बाइकमध्ये ६४९ सीसीचे समांतर ट्विन इंजिन देण्यात आले आहे जे ४७ बीएचपी पॉवर आणि ५२ एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकची किंमत 2 लाख 85 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
हार्ले डेव्हिडसनची ही बाईक हिरोच्या साहाय्याने विकसित करण्यात आली आहे, ज्यामध्ये 440 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे 27bhp पॉवर आणि 38 एनएम टॉर्क जनरेट करेल. या बाईकची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत 2 लाख 39 हजार रुपये आहे.