AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Car Discount : स्वस्त टाटा कारपासून महागड्या एसयूव्हीपर्यंत, तुम्हाला परवडणाऱ्या ऑफर्स, फिचर्स आणि किंमतही जाणून घ्या…

Tata Car Discount : या निवडक टाटा कारवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि इतर अनेक ऑफर उपलब्ध आहेत. 31 ऑगस्टपर्यंत हा लाभ घेता येईल. तुमच्या कामाची बातमी...

Tata Car Discount : स्वस्त टाटा कारपासून महागड्या एसयूव्हीपर्यंत, तुम्हाला परवडणाऱ्या ऑफर्स, फिचर्स आणि किंमतही जाणून घ्या...
टाटा हॅरियरImage Credit source: social
| Updated on: Aug 15, 2022 | 1:18 PM
Share

नवी दिल्ली : टाटा मोटर्सकडे (Tata Moters) भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक कार (Car) आहेत. या कार वेगवेगळ्या फीचर्स आणि किमतीच्या आहे. यातही प्रकार आहेत. आता ऑगस्ट महिन्यात या गाड्यांवर सवलतही मिळू शकते, जी काही निवडक मॉडेल्सवर उपलब्ध आहे. यामध्ये टाटा हॅरियर, सफारी, नेक्सॉन एसयूव्ही, टियागो आणि टिगोर हॅचबॅक कारचा समावेश आहे. टाटा नेक्सॉनला (Tata Nexon) जागतिक सुरक्षिततेच्या दृष्टीने 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या निवडक टाटा कारवर उपलब्ध असलेल्या सवलतींबद्दल बोलायचं झाल्यास या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि बरेच काही समाविष्ट आहे. हा लाभ 31 ऑक्टोबरपर्यंत घेता येईल. टाटा मोटर्सने या ऑफरमध्ये Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅक आणि पंच SUV समाविष्ट केलेले नाहीत. याविषयी अधिक जाणून घ्या…

हायलाईट्स

  1. Tata Motors च्या SUV कारला ऑगस्ट महिन्यात बरीच बचत करण्याची संधी
  2. Hyundai Creta आणि Kia Seltos च्या प्रतिस्पर्धी कारवर कमाल 45000 रुपयांची बचत
  3. 40,000 रुपयांचे एक्सचेंज आणि 5000 रुपयांच्या कॉर्पोरेट बोनसचा समावेश
  4. टाटाच्या या SUV कारमध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन, जास्तीत जास्त 168 bhp पॉवर जनरेट करू शकते.

कोणतीही कार घ्यायची असली की त्याबद्दल अधिक माहिती असावं. त्या कारसंदर्भात तुम्हाला सगळे फीचर्स आणि किमतही माहिती असावी. आम्ही काही कारविषयी तुम्हाला सांगणार आहोत.

  1. Tata Harrier : Tata Motors च्या SUV कारला ऑगस्ट महिन्यात बरीच बचत करण्याची संधी मिळत आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos च्या प्रतिस्पर्धी कारवर कमाल 45000 रुपयांची बचत करू शकतात. यामध्ये 40,000 रुपयांचे एक्सचेंज आणि 5000 रुपयांच्या कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे. टाटाच्या या SUV कारमध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 168 bhp पॉवर जनरेट करू शकते.
  2. Tata Safari: Mahindra XUV700 चे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी Tata Safari वर 40,000 पर्यंत सूट मिळवू शकतात. हे फायदे या महिन्याच्या अखेरीस दार ठोठावू शकतात. हे फायदे केवळ वापरलेल्या कारच्या एक्सचेंजवर उपलब्ध आहेत.
  3. टाटा टिगोर: टाटा मोटर्सची सब-कॉम्पॅक्ट सेडान पेट्रोल व्यतिरिक्त CNG आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सला एक्स-शोरूम किंमतीवर 23 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. मात्र, ही ऑफर फक्त XE, XM आणि XZ व्हेरियंटमध्येच मिळू शकते. यामध्ये सीएनजी प्रकाराचा समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट मिळू शकते.
  4. Tata Tiago: टाटा मोटर्सच्या या छोट्या हॅचबॅक कारवर देखील Tigor प्रमाणे सूट मिळत आहे, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना भरपूर पैसे वाचवण्याची संधी मिळेल. लक्षात ठेवा की या ऑफरमध्ये CNG व्हेरिएंटचा समावेश नाही.

वरील ऑफर जाणून या तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. या महिन्यात तुम्हाला नवी कार घरी आणण्यासाठी वरील कोही पर्याच आम्ही दिले आहेत.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.