AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 5 लाखात दमदार SUV, Creta, Seltos ला टक्कर देण्यासाठी Tata ची कार लवकरच बाजारात

ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos), किया सोनेट (Kia Sonet), ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite) या SUVs ने भारतीय मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे.

अवघ्या 5 लाखात दमदार SUV, Creta, Seltos ला टक्कर देण्यासाठी Tata ची कार लवकरच बाजारात
Tata Hbx
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 27, 2021 | 3:47 PM
Share

मुंबई : भारतात SUV सेगमेंट आता खूपच लोकप्रिय झालं आहे. ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos), किया सोनेट (Kia Sonet), ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite) या SUVs ने भारतीय मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे. या वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येईल की, आता प्रीमियम SUV भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळेच भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने Ignis आणि अर्बन SUV लाँच केली आहे. परंतु आता टाटा (Tata) कंपनीदेखील या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा आणि ह्युंदाय या दोन वाहन उत्पादक कंपन्या लवकरच भारतीय मार्केटमध्ये दोन नव्या SUV लाँच करणार आहेत. (Tata HBX can compete with Creta, Seltos, hbx to launch soon in 5 lakh Rs price)

टाटा ज्या SUV ला मार्केटमध्ये उतरवण्याची तयारी करत आहे त्या एसयूव्हीचं नाव HBX असं आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारची किंमत. ही कार अवघ्या 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या किंमतीत भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या कारचे काही फीचर्स हे टाटाच्याच नेक्सॉनप्रमाणे असतील. परंतु या कारचा प्रिमियम लुक ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करेल, यात शंका नाही.

कधी होणार लाँच

टाटाने ऑटो एक्सपो 2020 मध्ये HBX या कारची झलक दाखवली होती. कंपनीने म्हटलं आहे की, जी कार लाँच होणार आहे त्या कारचं 90 टक्के डिझाईन हे एक्सपोमध्ये दाखवण्यात आलेल्या कारप्रमाणेच असेल. टाटा HBX केवळ एका कॉन्सेप्टचं नाव आहे, परंतु ही गाडी टाटा हॉर्नबिल या नावाने सादर केली जाऊ शकते. Tata HBX तिचे प्रतिस्पर्धी Mahindra KUV100 आणि Maruti Suzuki Ignis ला टक्कर देणार आहे.

जबरदस्त इंजिन

एचबीएक्स ही कार 1.2-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे धावेल, हे इंजिन टाटाच्या अल्ट्रॉझ या कारमध्ये देण्यात आलं आहे. हे इंजिन 6000rpm वर 84bhp पॉवर तर 3300rpm वर 113Nm टॉर्क जनरेट करु शकेल. ही गाडी 5 स्पीड मॅनुअल आणि एएमटीसह सादर केली जाऊ शकते. Tata HBX ही कार लोकप्रिय ठरली तर Tata या कारसह Altroz चं टर्बो पेट्रोल इंजिनही लाँच करु शकते.

हेही वाचा

अपडेटेड डिझाईन, जबरदस्त फीचर्ससह रेनॉ अधिकृत Dacia ची 2022 Duster बाजारात

5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार

लांचिंगआधीच Hyundai च्या ‘या’ SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती

(Tata HBX can compete with Creta, Seltos, hbx to launch soon in 5 lakh Rs price)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान