AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार

मारुती बलेनो (Maruti Suzuki Baleno) आज बाजारात उपलब्ध असलेली सर्वात यशस्वी प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ही कार आता अपडेट होणार आहे

5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार
Maruti Baleno
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 6:39 PM
Share

मुंबई : मारुती बलेनो (Maruti Suzuki Baleno) आज बाजारात उपलब्ध असलेली सर्वात यशस्वी प्रीमियम हॅचबॅक कार आहे. बरीच आधुनिक वैशिष्ट्ये, दमदार इंजिन आणि ट्रान्समिशन पर्याय असूनही अन्य कंपन्या आजपर्यंत बलेनोला मागे टाकू शकल्या नाहीत. विक्री चार्टमध्ये या कारने सातत्याने अव्वल स्थान कायम राखले आहे. दरम्यान, आता मारुतीने बलेनोमध्ये एक अपडेट आणलं आहे. मारुतीने 2015 मध्ये बलेनो लाँच केली होती. त्यानंतर या कारला केवळ 2019 मध्ये एक फेसलिफ्ट मिळालं होतं. (New maruti baleno is coming soon with 5 changes, check price and features)

आता 6 वर्षांनंतर हे वाहन पुन्हा एकदा श्रेणीसुधारित (अपग्रेड) करण्यास कंपनी सज्ज आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी या वाहनाची अनेक महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुमच्यासमोर या वाहनाची अशी 5 वैशिष्ट्ये घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला नवीन बलेनोमध्ये कोणते महत्त्वाचे अपडेट्स मिळतील याची कल्पना येईल.

नवीन एक्स्टीरियर

नवीन जनरेशन मारुती बलेनोमध्ये नवं एक्सटीरियर असेल, नवीन टेललॅम्प्ससह यात नवीन हेडलॅम्प्सही मिळतील, नवीन बंपर्स, नवीन एलॉय व्हील्स आणि नवीन फ्रंट ग्रिल मिळेल. याशिवाय कंपनी यात नवीन कलर ऑप्शन्स देऊ शकते. तथापि, या कारचा आकार बदलला जाणार नाही. जुन्याच आकारात ही कार लाँच केली जाईल.

नवीन इंटीरियर

यावेळी कंपनी नवीन डॅशबोर्ड लेआउट, नवीन सीटिंग आणि upholstery सह व नवीन मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हील देऊ शकते. त्याच वेळी, यात एक मोठी फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. कंपनी रियर एसी व्हेंटसह फास्ट चार्जिंग पोर्ट आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देऊ शकते. सर्वात मोठा अपग्रेड क्रूझ कंट्रोल आणि एसी व्हेंट असू शकतो.

नवीन सेफ्टी फीचर्स

कंपनी या कारमधील प्रवाशांसाठी 4 एअरबॅग आणि इतर सेफ्टी फीचर्स प्रदान करू शकते. मारुती यामध्ये वायरलेस चार्जिंग फीचरदेखील देऊ शकते. मारुती कंपनी सध्या नवीन प्लॅटफॉर्मवर आपली वाहने तयार करीत आहे, म्हणून यावेळी बलेनो जरा अधिक मजबूत होऊ शकते.

नवीन इंजिन पर्याय

कंपनी आरएस बॅजसह वाहने लाँच करू शकते. मारुती या कारच्या माध्यमातून आपलं बूस्टरजेट इंजिनदेखील परत आणू शकते. याशिवाय कंपनी डिझेल इंजिनही देऊ शकते. बलेनोचे मायलेज सुधारण्यासाठी, कंपनी यात एक हायब्रिड इंजिन देखील देण्याचा विचार करत आहे, हे इंजिन प्रीमियम हॅचबॅकसाठी खूप प्रसिद्ध आहे.

किंमत

या कारची किंमत 6.94 लाख रुपयांपासून ते 10.70 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

(New maruti baleno is coming soon with 5 changes, check price and features)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.