AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लांचिंगआधीच Hyundai च्या ‘या’ SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती

Hyundai Alcazar एसयूव्ही शुक्रवारी (18 जून) अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आली. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत 16.30 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

लांचिंगआधीच Hyundai च्या 'या' SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती
Hyundai Alcazar SUV
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 19, 2021 | 10:50 PM
Share

मुंबई : बहुप्रतीक्षित Hyundai Alcazar एसयूव्ही शुक्रवारी (18 जून) अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आली. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत 16.30 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे, तर या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 19.99 लाख रुपये मोजावे लागतील. या दोन्ही किंमती एक्स शोरुम आहेत. ही कार भारतीय बाजारात टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस या दोन गाड्यांना तगडी स्पर्धा देईल. (More than 4000 bookings for Hyundai Alcazar SUV before launch, Customer preferred diesel variant)

दरम्यान, ह्युदायकडून सांगण्यात आले आहे की, लाँचिंगपूर्वीच या कारसाठी 4000 हून अधिक बुकिंग्स प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 55 टक्के लोकांनी डिझेल व्हेरिएंटला पसंती दर्शवली आहे. ह्युंदाय Alcazar ही एसयूव्ही क्रेटावर आधारित आहे, जी 2015 मध्ये लाँच करण्यात आलेली मिड-साईज एसयूव्ही आहे. क्रेटाने भारतीय बाजारात ह्युंदायला मोठं नाव मिळवून दिलं आहे. अल्काझारचा व्हीलबेस 2760 मिमी इतका आहे, तर आपल्याला यामध्ये 180 लीटर बूट स्पेस मिळते.

व्हेरिएंट्स

Alcazar ही कार कंपनीने तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये Prestige, Platinum आणि Signature चा समावेश आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. ग्राहकांना पेट्रोलमध्ये मिळणारं बेस व्हेरिएंट 7 सीटर पर्याय असेल आणि हे व्हेरिएंट मॅन्युअल ट्रांसमिशनसह येईल. त्याच वेळी, डिझेल इंजिनचे बेस मॉडेलदेखील सारखंच आहे. यानंतर तुम्हाला Prestige 6 सीट ऑप्शन आणि नंतर Prestige (O) मध्ये 7 सीट ऑप्शन मिळेल. एकूण 6 सिंगल आणि दोन ड्युअल टोन कलरसह ही एसयूव्ही सादर करण्यात आली आहे.

कलर आणि इंजिन पर्याय

सिंगल टोन कलरमध्ये तुम्हाला Phantom ब्लॅक, पोलर व्हाइट, Starry नाइट, Taiga ब्राऊन, Titan ग्रे आणि टायफून सिल्व्हर हे रंग मिळतील. डुअल टोन कलरमध्ये तुम्हाला पोलर व्हाइट, फँटम ब्लॅक रूफ आणि टायटन ग्रे हे रंग मिळतील. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 2.0 लीटरचं पेट्रोल इंजिन मिळेल, जे 152 hp पॉवर आणि 191Nm टॉर्क देईल. यामध्ये तुम्हाला 1.5 लीटर डीझेल इंजिन मिळेल, जे 115hp पॉवर 250Nm टॉर्क देईल. पेट्रोल इंजिन 14.2 किलोमीटर प्रती लीटर मायलेज देतं. तर डिझेल इंजिन तुम्हाला 18.1 kmpl मायलेज देईल.

इतर फीचर्स

या कारमध्ये तुम्हाला 26.03cm मल्टी डिस्प्ले डिजिटल क्लस्टर, 8 स्पीकर्ससह बोस प्रीमियम साऊंड सिस्टिम, ऑटो हेल्दी एयर प्यूरीफायर, फ्रंट रो सीटबॅक टेबल रिट्रॅक्टेबल कप होल्डर आणि आयटी डिव्हाइस होल्डसह अनेक फीचर्स मिळतात. तसेच यामध्ये तुम्हाला फ्रंट रो स्लायडिंग सनवायजरही मिळेल. गाडीमध्ये रियर विंडो सनशेड मिळेल. तसेच यामध्ये तुम्हाला व्हॉईस इनेबल्ड स्मार्ट पॅनोरोमिक सनरूफ देण्यात आलं आहे. ही कार 64 कलर एंबियंट लायटिंग, पॉवर ड्रायव्हर सीट आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह येते.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

(More than 4000 bookings for Hyundai Alcazar SUV before launch, Customer preferred diesel variant)

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!