मुंबई महापालिकेच्या ताफ्यात Tata Nexon EV, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?

टाटा मोटर्सने शनिवारी सांगितले की, कंपनीने ईईएसएलसोबत केलेल्या निविदा करारानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेला म्हणजेच एमसीजीएमला त्यांचे इलेक्ट्रिक वाहन नेक्सॉन ईव्ही सादर केली आहे.

मुंबई महापालिकेच्या ताफ्यात Tata Nexon EV, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 8:16 AM

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांकडे सरकार आणि लोकांचा कल वाढत आहे. ऑटोमोबाईल उत्पादक टाटा मोटर्सने शनिवारी सांगितले की, कंपनीने ईईएसएलसोबत केलेल्या निविदा करारानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेला म्हणजेच एमसीजीएमला (Municipal Corporation of Greater Mumbai) त्यांचे इलेक्ट्रिक वाहन नेक्सॉन ईव्ही सादर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र EV धोरण सुरू झाल्यानंतर, राज्य हरित क्रांती सुरू करण्यासाठी सज्ज आहे. (Tata Motors delivers Nexon EV to Brihanmumbai Municipal Corporation)

याव्यतिरिक्त, कंपनीने सांगितले की, ते भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटी वाहने स्वीकारत आहे. टाटा युनिव्हर्स नावाची त्यांची इमोबिलिटी इकोसिस्टम, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ऑटो कॉम्पोनेंट्स, टाटा फायनान्स आणि क्रोमा यांसह देशभरात कार्यरत असलेल्या टाटा समूहाच्या कंपन्यांद्वारे विविध प्रकारचे सपोर्ट सोल्यूशन्स ऑफर करते, जी साउंड ईव्ही बनवण्याचा प्रयत्न करते.

उत्पादनाबद्दल बोलताना, ऑटोमेकरने म्हटले आहे की, नेक्सॉन ईव्ही 30.2 किलोमीटर पर आव्हर लिथियम-आयन बॅटरीसह पॉवरफुल आणि हाय कॅपॅसिटी वाल्या एसी मोटरसह सुसज्ज आहे. ही एसयूव्ही जानेवारी 2020 मध्ये लाँच करण्यात आली होती. सध्या ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.

मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं

“पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (E.V.) ही काळाची गरज असून नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील पर्यावरण पूरक बाबींचा जास्तीत-जास्त वापर करावा,” असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सध्या 966 वाहने आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल यासारख्या खनिज तेलावर चालणाऱ्या वाहनांसह सीएनजी सारख्या पर्यावरणपूरक वाहनांचाही समावेश आहे. याच ताफ्यामध्ये आजपासून 5 इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ‘टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’ व्हेहिकल असे मॉडेल नाम असणाऱ्या सदर पाचही कार या केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत. ही वाहने ‘ड्राय-लीज’ पद्धतीने सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली असल्यामुळे सदर वाहनांसाठी दरमहा रुपये 27 हजार इतका खर्च असणार असून यामध्ये परिरक्षण व दुरुस्तीचा देखील समावेश आहे. सदर वाहनांमध्ये परंपारिक खनिज तेल वापरण्यात येत असल्यामुळे या वाहनातून हरित वायू, कार्बनडायऑक्साईड इत्यादी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहने साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.

कशी आहे टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्ही?

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.

या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरने 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरने नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्च करण्यासाठी 60 मिनिटे पुरेशी आहेत. या कारला 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देण्यात आली आहे, तसेच यामध्ये IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे.

इतर बातम्या

गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं, स्वच्छ मुंबईसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत व्हिजन-2030 ऑनलाईन सर्वेक्षण सुरु

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

(Tata Motors delivers Nexon EV to Brihanmumbai Municipal Corporation)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.