मुंबई : लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा लॅटिन एनसीएपीने (NCAP) अलीकडेच या प्रदेशात विकल्या जाणाऱ्या सुझुकी स्विफ्ट या कारची क्रॅश-टेस्ट केली. सुरक्षा वॉचडॉगकडून या कारला शून्य-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅटिन NCAP द्वारे चाचणी केलेली कार मारुती सुझुकी मोटर गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये बनवण्यात आली आहे, म्हणजेच ती मेड इन इंडिया कार आहे. कारला अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनच्या बाबतीत 15.53 टक्के रेटिंग मिळालं आहे, तर लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत या कारला 0 टक्के रेटिंग मिळालं आहे. (Tata Motors trolls Maruti on social media after Suzuki Swift scores zero star in Latin NCAP crash test)