AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 लाखांपेक्षा कमी किमतीत 7 सीटर कार, टाटा एसयूव्हीची खासियत जाणून घ्या

तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. टाटा सफारीच्या लेटेस्ट एसयूव्हीमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर एसयूव्हीपेक्षा वेगळे बनवतात. टाटा सफारी क्लासिक 2025 फीचर्स आणि किंमतीचा संपूर्ण तपशील येथे वाचा. या सफारीचा क्लासी लूक पाहून तुम्हालाही गाडी घ्यावी वाटेल.

11 लाखांपेक्षा कमी किमतीत 7 सीटर कार, टाटा एसयूव्हीची खासियत जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Feb 12, 2025 | 3:13 PM
Share

तुम्हाला कार घ्यायची आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला थोडं थांबावं लागेल. कारण, ही कार लॉन्च होणार आहे. ऑटो एक्स्पो 2025 मध्ये ही कार सादर करण्यात आली होती. कारची किंमत तुमच्या बजेटमध्येही बसू शकते.

तुम्ही स्वतःसाठी उत्तम 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. टाटा मोटर्सने आपल्या टाटा सफारी क्लासिकमध्ये उत्कृष्ट प्रगत फीचर्स आणि दमदार इंजिन दिले आहे.

कारची किंमत तुमच्या बजेटमध्येही बसू शकते. गेल्या महिन्यात झालेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये ही कार सादर करण्यात आली होती. यावर्षी लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. ही कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल की नाही? खाली दिलेला तपशील वाचून तुम्ही निर्णय घेऊ शकता.

टाटा सफारी क्लासिकमध्ये ‘ही’ फीचर्स

टाटा सफारी क्लासिकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये पॉवर स्टीअरिंग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम एबीएस, फ्रंटमध्ये पॉवर विंडो, एअर कंडिशनर, ड्रायव्हरसाठी एअरबॅग, पॅसेंजर सीटवरील एअरबॅग, फ्रंटमध्ये फॉग लाइट्स, क्लासी अलॉय व्हील्स, मल्टी फंक्शन स्ट्रिंग व्हील्स, टॅकोमीटर, डिजिटल क्लॉक, अ‍ॅडजस्टेबल हेडलॅम्प्स, रियर विंडो वायपर, सेंट्रल लॉकिंग अशा अनेक फीचर्सचा समावेश असू शकतो.

‘या’ कारमध्ये टाटाचे इंजिन

टाटा सफारी क्लासिक कारच्या दमदार इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात 2179 सीसीचे इंजिन मिळू शकते. जे 153.86 बीएचपीची कमाल पॉवर आणि 400 एनएमचा जास्तीत जास्त न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय मिळत आहेत.

कारमध्ये 63 लिटरची फ्यूल टँक देण्यात आली आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही कार 14.1 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देऊ शकते.

टाटा सफारी क्लासिकची किंमत किती?

टाटा सफारी क्लासिकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनी याला खूप कमी किंमतीत ऑफर करू शकते, अशी शक्यता आहे. कंपनीने ही कार 6 व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.99 लाख रुपयांपासून 16.62 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

वर नमूद केलेले सर्व तपशील मीडिया रिपोर्ट्सनुसार आहेत. ही कार बाजारात लाँच करण्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.