प्रदूषण टाळण्यासाठी ‘हा’ देश केवळ इलेक्ट्रिक वाहनं विकणार, जाणून घ्या संपूर्ण योजना

जगभरातील अनेक देशांनी ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान, थायलंडने शून्य-उत्सर्जन वाहनांच्या विक्रीची योजना आखली आहे.

प्रदूषण टाळण्यासाठी 'हा' देश केवळ इलेक्ट्रिक वाहनं विकणार, जाणून घ्या संपूर्ण योजना
Thailand Electric Cars
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 7:05 AM

बँकॉक : थायलंडने 2035 पासून केवळ शून्य-उत्सर्जन (Zero emission) वाहनांच्या विक्रीची आपली योजना सादर केली आहे. थायलंडचे म्हणणे आहे की, ते सध्या पारंपारिक इंजिन वाहने विकत आहेत. पण येत्या काही वर्षांत त्यांच्या देशाला इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत दक्षिण-पूर्व आशियातलं प्रमुख केंद्र बनवायचं आहे. (Thailand will only sell all-electric cars after 2035 in bold zero-emission plans)

थायलंडमधील ऑटो सेक्टर हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे, या क्षेत्रात 8,50,000 कामगार कार्यरत आहेत, तसेच लोह आणि स्टीलपासून ते पेट्रोकेमिकल आणि प्लास्टिक उद्योगांमध्ये देशातील ऑटो सेक्टरचा सुमारे 10% वाटा आहे. देशात बनवलेल्या जवळपास निम्म्या गाड्या फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि मलेशियासारख्या ठिकाणी निर्यात केल्या जातात. थायलंडच्या बोल्ड ईव्ही योजनेने दशकाच्या अखेरीस सर्व नवीन कार नोंदणीसाठी 50% इलेक्ट्रिक वाहनांचे लक्ष्य ठेवले आहे. या वर्षाच्या सुरूवातीस त्यांनी 30 टक्के हिस्सेदारीचं लक्ष्य ठेवलं होतं.

इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल करण्याची गरज

ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरण समितीचे सल्लागार कविन थांगसुपानिच यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, आपण पाहू शकता की, जग त्या (इलेक्ट्रिक) दिशेने वाटचाल करीत आहे, म्हणून आपल्याला अधिक गतीने पुढे जावे लागेल. थायलंडमध्ये सध्या कंबशन इंजिन गाड्या बाजारातून बाजूला करण्यासाठी वेळ निश्चित केली आहे. अशा परिस्थितीत आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल करण्याची सरकारची इच्छा आहे.

पायाभूत सुविधा व नियम गरजेचे

थांगसुपानिच म्हणाले की, ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना देशातील ईव्हीचा सहज अवलंब करण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा व नियम तयार करण्यावर काम करावे लागेल. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांवर स्विच केल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल लोकांना जाणीव करून देण्यासाठी देशाला विविध जागरूकता कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल.

पारंपारिक वाहन विक्रीत 26 टक्क्यांची घट

सध्या, थायलंडच्या इलेक्ट्रिक व्हेईकल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, थायलंडमधील बॅटरी इलेक्ट्रिक वाहने 1% पेक्षा कमी कार्सचे योगदान देतात. तथापि, 2020 मध्ये देशातील ईव्ही कार विक्रीत 1.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर पारंपारिक वाहन विक्रीत 26 टक्क्यांनी घट झाली आहे.

संबंधित बातम्या

Toyota ची सूर्यकिरणांद्वारे चार्ज होणारी Electric Car सादर, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत

येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल; गडकरींना विश्वास

Tesla ने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं, अन्यथा… नितीन गडकरींचा सल्लावजा इशारा

(Thailand will only sell all-electric cars after 2035 in bold zero-emission plans)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.