Brezza : ब्रेझाचे नवीन मॉडेल लाँच होण्याच्या तयारीत… आकर्षक डिझाईन अन्‌ जबरदस्त फीचर्ससह ग्राहकांच्या भेटीला

Brezza : ब्रेझाचे नवीन मॉडेल लाँच होण्याच्या तयारीत... आकर्षक डिझाईन अन्‌ जबरदस्त फीचर्ससह ग्राहकांच्या भेटीला
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: social

29 किंवा 30 जूनपर्यंत मारुती आपली नवीन कार लाँच करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 29, 2022 | 1:38 PM

मुंबई : मारुती (Maruti) आपल्या एसयुव्ही सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले विटारा ब्रेझाला (Brezza) नवीन अवतारामध्ये ग्राहकांच्या भेटीला आणण्याच्या तयारीमध्ये आहे. मारुती पुढील महिन्यात कधीही हे नवीन मॉडेल बाजारात उतरवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 29 किंवा 30 जूनपर्यंत मारुती ही नवीन कार लाँच करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, नवीन ब्रेझामध्ये अनेक बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. या नवीन बदलांमध्ये कार डिझाईनपासून (design) ते इंटीरिअर, फीचर्समध्येही बरेच बदल करण्यात आले आहे. टीम बीएचपीच्या रिपोर्टनुसार मारुती आपल्या नवीन मॉडेलचे नाव विटारा सोडू शकते.

नवीन मॉडेलच्या डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीने आपल्या नवीन मॉडेलला केवळ बाहेरुन नवीन लूक देण्याचा प्रयत्न केला नसून इंटीरिअरमध्येही अनेक बदल करण्यात आले आहे. यात काही नवीन प्रीमिअम लग्झरी फीचर्सदेखील जोडण्यात आले आहे. हे नवीन फीचर्स आधीच्या ब्रेझामध्ये देण्यात आले नव्हते. पुढील काही मुद्द्यांच्या आधारे नवीन मॉडेलच्या फीचर्सही माहिती घेणार आहोत.

हे सुद्धा वाचा

  1. ब्रेझाच्या नवीन मॉडेलमध्ये कंपनीने सनरुफ फीचर वाढविले आहे. हे फीचर असलेली ही मारुतीची पहिली कार असेल.
  2. ब्रेझाचा फ्रंट लूक तसेच ग्रीलच्या डिझाईनमध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत.
  3. ग्रीलसह ब्रेझामध्ये एलईडी हेडलँप आणि एलईडी DRLs देखील देण्यात आले आहे.
  4. ब्रेझाच्या मागील भागातील डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास, टेललँपच्या डिझाईनमध्ये अनेक बदल आहे. त्यात आता नवीन स्लीक एलईडी लँप देण्यात येणार आहे.
  5. नवीन मॉडेलमध्ये मारुतीने डुअल टोन अलॉय व्हील दिले आहेत. त्यामुळे कारला चांगला लूक मिळाला आहे.
  6. रिपोर्टनुसार, सेफ्टीसाठी मारुतीने एक्स्ट्रा स्टील बॉडीचा वापर केला आहे.
  7. इंटरटेनमेंटसाठी मॉडेलमध्ये 9.0 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. यामध्ये स्मार्टप्ले प्रो प्लस, 360 डिग्री कॅमेरा आणि एचयुडी कनेक्टेड असणार आहे.
  8. रिपोर्टनुसार, कंपनीने या वेळी ब्रेझाच्या डॅशबोर्डला अजून प्रीमिअम लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
  9. सेफ्टीच्या हिशोबाने NCAP ने  ब्रेझाला 4 स्टार रेटींग दिली आहे.
  10. ब्रेझामध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबेग देण्यात आल्या आहेत. ज्याच्या माध्यमातून पॅसेंजर्सना चारही बाजूने सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें