Royal Enfield : रॉयल एनफिल्डच्या एकापेक्षा एक बाईक्स… कधी होणार लॉन्च?

रॉयल एनफिल्ड इंडियन बाईक मार्केटमध्ये अनेक नवीन बाइक्स आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या 350 सीसी, 450 सीसी आणि 650 सीसी सेगमेंटमध्ये नवीन रेट्रो बाइक्स लॉन्च करू शकते. या नवीन बाईकच्या लॉन्चिंगमुळे रॉयल एनफिल्ड रेट्रो मोटरसायकल सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

Royal Enfield : रॉयल एनफिल्डच्या एकापेक्षा एक बाईक्स… कधी होणार लॉन्च?
रॉयल इन्फिल्ड
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 14, 2022 | 12:34 PM

रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) बाइक्स त्यांच्या रेट्रो डिझाइन आणि दमदार इंजिनसाठी सर्वत्र लोकप्रिय आहेत. लांब असो किंवा रोजचा प्रवास असो ही बाईक नेहमीच बाईकप्रेमींची पहिली पसंती ठरली आहे. या बाइक्स सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी आरामदायक असतात. कंपनीकडे लाइनअपमध्ये अनेक दमदार बाइक्स आहेत, परंतु कंपनी 350 सीसी, 450 सीसी आणि 650 सीसी सेगमेंटमध्ये (650 cc segment) काही नवीन बाइक आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, लवकरच रॉयल एनफिल्डची नवीन बाईक बाजारात दमदार इंजिन (engine) पॉवरसह दाखल होऊ शकते. या बाईकबाबत या लेखातून अधिक माहिती घेणार आहोत.

हे सुद्धा वाचा

  1. Royal Enfield Himalayan 450 : रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 भारतात 450 सीसी सेगमेंटमध्ये लॉन्च करू शकते. अपकमिंग बाईक 450 सीसीच्या पॉवरफुल इंजिनसह पुढील वर्षी भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. त्याची अपेक्षित एक्सशोरूम किंमत 2.80 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.
  2.  Royal Enfield Super Meteor 650 : इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल GT नंतर, कंपनी पुढील महिन्यात 650 सीसी सेगमेंटमध्ये Super Meteor 650 लॉन्च करू शकते. त्याची संभाव्य एक्सशोरूम किंमत 3.30 लाख रुपये असू शकते. ही भारतातील सर्वात स्वस्त 650 सीसी बाईक्सपैकी एक असेल.
  3.  Royal Enfield Shotgun 650 : ही बाईक अनेक वेळा टेस्टींग दरम्यान पाहिली गेली आहे. आगामी बाईक 650 सीसी सेगमेंटमध्ये ऑफर होउ शकते. बॉबर स्टाइलिंगसह शॉटगन 650 या वर्षाच्या शेवटी 3.30 लाख रुपयांच्या संभाव्य सुरुवातीच्या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.
  4.  Royal Enfield Scram 450 : स्क्रॅम 450 ही कॉम्पॅक्ट आणि स्क्रॅम्बलर स्टाईल बाइक असणार आहे. अपकमिंग बाईकचा व्हीलबेस थोडा लहान असू शकतो. ही बाईक पुढील वर्षी रॉयल एनफिल्डच्या 450 सीसी सेगमेंटमध्ये एंट्री घेऊ शकते. Royal Enfield Scream 450 ची अपेक्षित एक्सशोरूम किंमत 2.60 लाख रुपये असू शकते.
  5.  Royal Enfield Classic 650 : ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. कंपनी 650 सीसी इंजिन असलेली ही बाईक आणण्याच्या तयारीत आहे. नवीन बाईकची डिझाईन क्लासिक 350 सारखी असेल. बाईकची संभाव्य एक्सशोरूम किंमत 2.90 लाख रुपये असू शकते.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें